Wednesday, December 23, 2009

प्राण माझा घेतलास तू


प्राण माझा घेतलास तू ,का तुला आले रडे
पाहिले डोळे तुझे मी ,ते कोरडेच कोरडे

स्वप्न तुझी भंगलित
हास्य तुझे माळले
तुझ्यासाठी प्रिये मी
प्राण माझे गाळले
तुझ्यातला भाव मला शोधुनाही ना सापडे ...!!

आला कुठून तो असा
सुर तुझा भेटला
खंत मनात बाळलेला
तो जरासा वाटला
माझ्या साठी जिव तुझा ना कधी धड्पड़े...!!

रक्त माझे विचारेल
तुला तुझि कहानी
ख़ुशी ख़ुशी सांग हां
आठवेल माझी वाणी
खुशामती कर तू शब्दांतून तुझ्या गड़े ...!!

अनंतात जाईंन जेव्हा
याद तुझी येइल खुप
डोळे भरून पाहिन तुला
बोलेन काही राहीन चुप
ता~या सारखा अडकून इथेच मी आहे खड़े ...!!



सूर्य

नाम काका....

नाम काका....

नाम काका तुम्ही आज काल काव्यांजलि वर गुपचुप येता ...(किव्हा नाही )
माहीत नाही पण तुम्ही यावे आणि आमच्या कवितांना तुमचा मोलाचा अभिप्राय द्यावा
नाही तर आम्हाला(मला ) आमच्याच कविता कळत नाहित ...

एक विनंती....

आज काल आम्हा
नाम काका आमुचे
राजे काव्यान्जलिचे
दिसत नाही !!

कुठे गेलात असे
राहुनिया येथे
फिरले आमचे माथे
आता तरी !!

तुमची साठी माझा
प्रवास मी केला
प्रसाद तुम्ही दिला
अभिप्रायी !!

भेटण्याची इच्छा
होते माझ्या मना
तरीही सज्जन्ना
मी नाही !!

रवि माझा मित्र
गुप्तचर जणू
नव्या खबरा आनु
तोचि देई !!

आता हां पसरा
व्यर्थ कसा जाईल
तुम्हा साठी येइन
ठान्यालाही !!

माझ्या मणि चिंता
आता काही नाही
नाम काका तुम्ही
यावे परतुन !!

वाट मी पाहतो
आसुसल्या डोळ्यांनी
नाहीतर हाना जोड्यांनी
तुमच्याच !!

काही झाले तरी
काव्यान्जलिवर यावे
आम्हा भेट द्यावे
दररोज !!

अखेरचा आज
धाडिला निरोप
लावा नवे रोप
"सूर्य " नामा !!

सूर्य म्हणे तुम्हा
नाम काका यावे
पुन्हा एक वेळ व्हावे
दंग आमच्यात !!

सूर्य

वेळ २.१० रात्री २२/१२/२००९

तुम्ही नाही आलात
अश्रु माझे आले
भरले सारे नाले
तुडूंब ..!!

नाल्यान मागे सा~या
नदया ही येतील
भर भरून वाहतील
खरोखर ...!!

नाम काका तुम्ही
कवितांचा पाया
ऑनलाइन रचिला
आम्हा मध्ये ..!!

तुम्ही जर इथून
अदृश्य झालात
कोसळु चिखलात
आम्ही सारे ...!!

मंदिरी कळस
उभा राहिला आहे
पाया तुमच्या वाहे
आमचा अभिमान ..!!


सूर्य

मैत्री....



दगडाचा भाग, लागे कोना एक
कुठे तरी भेग, पडतसे !!

मैत्री तुझी माझी ,जिवापार जप
करू मग तप ,मैत्रीमध्ये !!

नको जावू दूर ,हाथी दे हाथ
निभावू आपण साथ ,अन्तापरी !!

भेंडीचा बाजार ,भरला लोकाचार
जमावाचा अचार ,दुतरफा !!

तुझी माझी दोस्ती ,निभावू चल
आता होवू अचल ,मैत्री मध्ये !!

सूर्य

सत्याचा संसार...

सत्याचा संसार
हाती घे अभंग
बोलू तेची दंग
करणारे !!

उघड हे पाप
करू आम्ही सारे
इशान्याचे वारे
आलेतरी !!

वेड्या मनापरी
काय आम्हा पाशी
कबिरांची काशी
मनातली !!

मनुष्याच्या देहि
घ्यावा जन्म ख़ास
देवांचा ही ध्यास
एकंदर !!

भेटे तोचि एक
सदगुरुच्या नावा
मोक्श्याच्या गावा
नेत असे !!

वाटे खोटा नाटा
तरी सत्य आहे
डोळ्यांनी जो पाहे
हरी दिसे !!


सूर्य

Sunday, December 20, 2009

तुझ्या विरहात मी....


तुझ्या विरहात मी
पान्यातली नाव झालो.


तुझ्या विरहात मी
दगडाचा देव झालो


तुझ्या विरहात मी
दूर दूर वर उडालो


तुझ्या विरहात मी
पाण्यात ही बुडालो


तुझ्या विरहात मी
सारे काही सोडून आलो


तुझ्या विरहात मी
आयुष्याला तोडून गेलो


तुझ्या विरहात मी
तुझ्या विरहात मी

सूर्य ....

तुझ्या साठी ....

ओल्या पानाच्या रेषेत
उभा आहे मी सरळ
मन माझं धुंद बेधुद
आहे ओलं चिंब तरळ

तुझ्या सुहासाचा मागोवा
आलो करत इथवर
तुझ्या मोग~याचा आठवा
मिळेल मी जाइन तिथवर

तुझ्या प्रेमात भेटले
मला अजरामर नाव
तुझ्या विरहात होइन
जणू दगडाचा देव

तू जावू नको दूर
रहा ज़रा आस पास
तुझ्या विना मी अधूरा
तुझ्या साठी करीन उपवास

सूर्य ....

असा मी सूर्य ...


नव्या जुन्या आठवणी माझ्या
तुझ्या शिवाय फिरवत आहे
विना कारण देह माझा मी
जागो जागी मिरवत आहे

कळेना कश्याला कालच्या रातीला
जागेने जागरण करीत होतो
कालचा उपाशी अजूनही तसाच
प्रेमाला म्हणे जिरवत आहे


डाव्या डोळ्याची मशाल घेवुन
चाललो सखिच्या भेटीला आहे
कठिन रस्ते तुझे अजुनही
झोप डोळ्यांत जागवत आहे

कालचा सूर्य मी अजूनही असाच
काळ्या रुपात पेटतो जरी
राख माझी सांडते वाटे भोवती
मखमली प्रेम तुझे वागवत आहे


असा मी सूर्य ...
सूर्य

Thursday, December 10, 2009

काही अर्धवट स्वप्न ....



माझ्या वेदनाना कोणी
कसे पाहिले नाही ...
ते येतील आणि घेवून जातील .
माझ्या कविता ,माझी स्वप्न
आणि काही अर्धवट राहिलेली पत्र

ज्यांना मी नेहमी माझ्या
जवळ बाळगत होतो
अशी ती त्यातलीच एक
माझी वही ..

ते कधी तरी येतील
दनदनत्या आवाजात
माझ्या सा~या कविता
फेकतील
दलदलीत आणि गहाळ करतील

मुसाफिरान्च्या येण्या जाण्याने
त्यांचे अवशेष ..
कदाचित राहतील ही ..काही मागे ..
पण त्या भग्न ..सामुग्रिला
मी अजुन ही तसेच लावीन माझ्या उराशी
आणि त्यांची ...मरे पर्यंत
काळजी करेन....

मग लोक पाहतील मला
आणि त्या माझ्या कविता हसतील
माझ्यावरच
माझी स्वप्ने ..माझ्या कडून पाठ
फिरवतील ..
उरली सुरली पत्रे ...ओक्ष्या बोक्षी रडवतिल
मला

पण तरीही मी
खंबीर ..राहीन आणि त्यांची माझीच राख
सर्व घरात
पसरविन ...एका टोका पर्यंत ..
जो पर्यन्त ...
माझी कविता मला शोधत नाही

..घरात व् घराच्या आस पास ....



सूर्य

Sunday, November 29, 2009

आज या कल.....





आज या कल
मै न रोता हूँ . ....न गाता हूँ.....

सूरज की परछाई से
डरता डरता फिरता हूँ....आज या....

ठंडी हवा कुछ कहती है कानोमे
मै डगर डगर झूमता हूँ....आज या...

हिमालय की बुलंदिया आंखोसे गिरकर '
दुर्म माला बन जाता हूँ....आज या...

आंसू है मुस्क्कुरानेसे बिखरे नीव की जड़ से
अकड जखड दिखता हूँ....आज या...

बिन पंक्षी गूंजती आवाज मधुर
उमड़ उमड़ गुनगुनाता हूँ....आज या...



सूर्य....

अजुनी मी तुझ्याच साव .....


आठवानित तू येशील
अशीच
तुझ्या नावात
माझाच गाव ....

अजुनी मी तुझ्याच साव .....

तुझ्या विन काळिज
माझे
मांडेल कसा
आपला डाव ......

अजुनी मी तुझ्याच साव .....

भेट तुझी छळते रूतते
तुझ्या विन
अधुराच मी
खाव़ू नकोस आज भाव

अजुनी मी तुझ्याच साव .....

शब्द तुझे पेलणार मी
घाव तुझे झेलणार मी
पैलतिरी नेशील तूच
माझी नाव

अजुनी मी तुझ्याच साव .....

निखा~यात तू दिसतेस मला
अग्नि बाणात रुततेस मला
रूपाचे तुझ्या
अनंत वाव

अजुनी मी तुझ्याच साव .....


रचना ....सूर्य

सदादित सुख पाओ.....


पुढे तू उभी मागे मी उभा
असा आपुला प्रवास सुखाचा
आणिक सुखाचा भाव त्यात तुझा
कसा आठवावा दुखावा फुकाचा

कसे हे रागिनी तुला आवरू मी
सावरू कसे स्वताला आता मी
तुझे बोलने अमृतात नाहून आले
तुला रूपाचे शब्द पाहता मी

मनीचा भाव आज ओकून देतो
नव्हे जे सत्य ते आसक्तित राहो
तुझ्या विन मी माझ्या विन तू
असे हे मिलन सदादित जाओ

चरनाचा स्पर्श तुझ्या मस्तकी लाभों
तुझा आनंद गगनी न माओ
देवाची कृपा भामिनी अंत्य जड़ो
मरणाचा मोक्ष जीवनात समाओ

अनंतात तू काल दृष्टीस येवो
तुझ्या ही हरीची कृपातुज पाओ
सुखाचा भाग तुज माझाही मिळो
तुला जे आवडे कृपेची लाओ ....


रचना...... सूर्य
२७.११.२००९

Wednesday, November 25, 2009

डाव

युद्धाला तैयार आहोत
ह्याच आवाजात सर्व सैनिक तैयार
पण मी त्यांच्या मागे
कोण मी ?
कोण मी म्हणताच ..त्याच्यामागे त्याना चालविनारा
एक मी ..
आता सुरवात करावी तरी कशी ..?
घोड़ा .हत्ती ऊंट आणि वजीर
सरकतिल पुढे ..आणि राजा ला ही
करावे लागेल मागे पुढे
मग विचार कसला
...चला पुढे व्हा..आणि
आपला डाव मांडा.
ह्ह्म्म तोच डाव जो आपण कधी खेळलोच नव्हतो
ज्या रस्त्यावर ...कोणीही
हरु शकते आणि जिंकू शकते
पण ह्याच्या व्यतिरिक्त
अजुन ही काही आहे
जे आपण कधी पाहिले नाही
ह्या चौरंगात .आयुष्य
कसे मावते ते

आपण कमावलेले .आपण इथेच ठेवून जातो
सोबत कुणी येत नाही
पण ..करण्याची एक जिद्द असते
म्हणून हा डाव खेळुया

एक तुझा आणि एक माझा
...जिंकलास तर वाचलास ..आणि संपलास तर संपलास


सूर्य

तू वेडीच आहे....

ती मला पाहायची
चोरून...
आणि मी लपायचो तिला पाहून..
ती होती वेडी ...किती वेडी ते माहीत नाही

फिरायची दगड मारत ..
आणि आम्ही मुलं तिच्या मागे
ती पुढे आणि आम्ही मागे
..ती परत मागे फिरायची आणि .
आम्ही घाबरायचो ..आणि परत मागे
सरकायचो...
असच एकदा तिच्या मागे मागे गेलो
आणि
मग बसली एका दगडावर
झाडाखाली
.....आमच्या समोर ..
आणि म्हणाली ..
मी वेडी नाही

..मी म्हणालो ..हळूच ..
तू काय म्हानालिस ?
तिचे डोळे..
माझ्या नजराच पाहत होत्या
मी पुन्हा विचारले ..
काय म्हानालिस ?
थोड्याश्या रागाने
तिने मान खाली केलि आणि
पुन्हा म्हणाली
मी वेडी नाही
आणि आम्ही चार पाच मुले हसायला लागलो
..
पण ती ,,काहीच बोलत नव्हती
फक्त पाहत होती
माझ्या कड़े ..माझ्या नजरान्कडे
माझी मान जराशी वळलि आणि
तिने मला धरले ..
आणि मग म्हणाली
माझ्या काना जवळ येवून
मी वेडी नाही ..
मी लागलो रडायला
सर्वे मुले पळालि
बाबुला वेडी ने पकडले
बाबुला वेडी ने पकडले
असं म्हनत ओरडत सुटले
आणि माझा थरकाप झाला
पण मी म्हणालो
तू वेडी नाहीस ..
मग मला का पकड्लेस ?
सोड ना मला
...

ती माझ्या कड़े पाहत
...हसायला लागली
जोरजोरात
..जोर जोरात
आणि परत कानात म्हणाली
मी वेडी आहे
हा हा हा मी वेडी आहे
..
कसा तरी सूटलो
तिच्या तावडीतुन आणि मी पण म्हणालो तू वेडी च आहे
तू वेडीच आहे
'


सूर्य

Sunday, November 22, 2009

मला स्मरशील तू....


माझ्या वरी प्रेम किती करशील तू
पाहशील मला तेव्हा लाजशील तू

तुझ्या भोवती किती येर झ~या मारू
नाही म्हणून टोमने मारशील तू

आज दिवस प्रेमाचा उगवला तर
प्रेमा साठी किती झुरशील तू

प्रेम किती खोल माझे जानने आहे
बुडशील तेव्हाच प्रेमात तरशील तू

लाजुन पाहने हे तुझे नखरे आहेत
दुखात मी असता किती रडशील तू

आवाज येता माझा बहरतेस तेव्हा
हरवलोच मी कुठे मला शोधशील तू

मी आहे सूर्य बेखौफ किरणांचा राजा
किरणांची राणी माझी होशील तू

जमलेच नाही मला तुझे होने जरी
माझ्या सवे मला स्मरशील तू

सूर्य

मूड नाय आहे....

तू पिंज~यात होतीस
तेच चांगले होतीस
आता मला तुझि भीती
वाटायला लागली आहे
पण मी असा हार
मानणार नाही
तू असशील तुझ्या जातीतली
भायनक आणि हिंसक
क्रूर कृत्य करणारी
पण मी तुला सोडले


कारण आता माझा मूड नाय आहे
तुझ्या बंद डोळ्यांत मला
काहीच दिसत नव्हते.
पण मला तुझ्या
हाल अपेष्टा दिसत होत्या
त्याच माझ्या काळजाला
चिरून जात होत्या
आता तू
मुक्त
सूक्त
निर्भिड
बिनधास्त
आपल्या जगात परत जा
तुझी इथली गरज संपली
कारण
आता माझा मूड नाय आहे

तू भूताडकी नाहीस
पण अश्या रुपात आलीस
की मला
कसे तरी होते..
मी स्वतालाच
गुदगुदल्या करायला
लागतो
झोपलो की तुझी आठवण
उठालो की
तुझ्या डोळ्यातले पानी
मला दिसायचे
मगमी खरच किती क्रूर आहे
हेच जानवायचे मला

तुला तुझ्या आवासात
मला तुला
परत सोडायचे होते..
तुला मी आता मुक्त केले
तू जा तुजा
खुप लाम्ब जा
परत न येण्या साथी
खुप प्रेम केले मी तुझ्या वर
पण तुझ्या २ पिल्लांकडे पाहिले की
असे वाटते
तेच तुझे भविष्य
माझी मावु
तू जा कारण तुझ्या बंद डोळ्यांत मला
काहीच दिसत नव्हते.
पण मला तुझ्या
हाल अपेष्टा दिसत होत्या
त्याच माझ्या काळजाला
चिरून जात होत्या
आता तू
मुक्त
सूक्त
निर्भिड
बिनधास्त
आपल्या जगात परत जा
तुझी इथली गरज संपली
कारण
आता माझा मूड नाय आहे


"गुलाब " ....

रंगातच आहे तुझ्या एक जग मोठं
सांगेला का कोणी तुला कधी काही खोटं
वा~यावर पसरतो तुझा रंग छान
आवाजात तुझ्या माझे टवकारतात कान
किती भोळी तुझी काया वाटते महान
प्रेमाचे तू बंदिश आहे आकाराने लहान
लाजवत लाजवत येतोस तु जेव्हा
हृदया मध्ये काजवे प्रकाशतात तेव्हा





सूर्या हुन तेज तुझे आहे दिपवान
तुझ्या खातिर प्रेमापुढे झुकतेय मान
लाल लाल रंगाचा बाजार तुझा फुले
तुला पाहून बहरतात फुलातिल मुले
कसे सांगू रानीला तुझ्या बद्दल सारे
तुला देवून तिच्या स्वाधीन मन माझे झुरे
मन तुझे मन माझे आहे एकसमान
हेच दिले देवाने आहे तुला वरदान






सुकतात पाकळ्या होते दुख मला
तरीही जपावासा वाटतोस फुला
सांगितली तुझी ही मला जीने कहानी
तीच होती तीच होती माझी एक नानी



सूर्य....

वारा ....

वारा ....

कधी होतो शांत जरासा
कधी हळूच लचका देतो
येतो असाच एकांती
कधी लपून दचका देतो ...

कधी झुलुक होतो हलकीशी
कधी व्योमगंगे तुन वाहतो
अश्याच एका शांत तेत
कधी स्वताहाला हरवून देतो

कधी पवित्र स्नान गर्भाशी
असाच बिलगून वाहून जातो
भासे आसपास ,पण नसे कवेत
कधी ॠतुंची मैत्री देतो ..


सूर्य

वारा ....

पाहण्यास मी आतुर आहे
अवती भवति असला जरी
स्पर्श त्याचा मोहनी जातो
भासे मज परिस परी..

निराशा असल्यास डोळा
घुमतो असाच चहु कड़े
वाहून नेतो चिंतान्ना अन
आनंद फुलावी इकडे तिकडे


सूर्य

वारा....

आताच होता गेला असेल
सा~यांनी त्याला घेरले असेल
सापडेल का कुणाला तो
हाता त्यांच्या काही नसेल

भलते सलते प्रश्न माझे
मनाच्या माझ्या कोडे पड़े
कसा असेल वारा हा ?
कोनाच त्याला पकडत नसेल

सांगिल का कोणी मला
चोही कड़े आहे जसा
वारा त्याला म्हणतात सारे
खरा असेल का तो नसेल


सूर्य

वारा ....

अजुन ही असतील कोडी
येता आहेत माझ्या मनात
जेव्हा तू
असतोस
मी असतो
आव्ळ्तोस
घट्ट करतोस
माझी पकड़
सैल होताच
फिरतोस
आजुला
बाजुला
मी तुझ्यात
दंग
भंग
संग
नाचतो
खेळतो
हसतो
फसतो
आनद साजरा करतो
तेव्हा तू असतोस माझ्या सोबत


सूर्य

पसरल्यावर शांतता
होतो असाच गुडुप
कधी एने नाही
कधी जाने नाही
तरीही भास् होतो तुझा
तसाच मी ही येतो
तुझ्या कड़े आता
आणि तू मला समज
की मी तुझ्यातलाच आहे
माझ्या अवती भवति
तुझे वेटोळे कर
माझ्या मुखातून
तुझा प्राण आणि तुझ्या
मुखातून मी
असाच येत राहो
ह्या साठी ..
माझ्या अंतर बाह्य
तुझ्या सागरातुन तू
दरवळत रहा ..

असाच .
स्वछंदी
एकांती
भरकटत
धुवांवर
माझ्या
आसपास ..


सूर्य

आला आणि गेला
तो तूच होता
मला समजुन झाले
हां ही तूच होता
तुझ्या वाचून मी आणि
माझ्या वाचून तू
नाही राहू शकत
म्हणुन गुपचुप
झोपेत असताना
येतोस आणि पटकन
पळुन जातोस ..

हे तुझे वागने
बरे नाही
...माझ्या पासून
लपशील तर मी
तुझ्यात कसा हरवीन

तुझे कोडं
तू कसा सोडवशील
माझ्या वाचून
तू आणि तुझ्या
वाचून मी असे
नाही होवू शकत
तू असाच ये
आत जा
माझे खंगाळलेले
शरीर..
निर्बंध असतांना
तू एक वारा बनून ये आणि
समेतून जा
आपल्यातच

सूर्य

घोर निराशेचा
केंद्र बिंदु असलेलो मी
तुझ्या प्रेमात
पडलो तरी कसा
...
..
..तू ला माहीत असेल ही
कारण मी
तुझ्यातच आपले अस्तित्व पाहतो
जगतो ..तुजवाचुन नाही


सूर्य

तू असा राहशील
का ?
जसा
आता आहेस
कोण जाने तुझ्यातच
किती तरी दुर्गंधी
असेल ..
आणि आता ती शुद्धी करना साठी
तू
माझ्या कड़े
आपोआप
खेचला जात आहेस
मी तुझी वाट
पाहत नाही
पण तूच असा
खेचला जातोस की
मला बैचेन
व्हावे लागते
आणि तुला नविन रुपात
मी आभासतो

असाच



सूर्य

आज तू हल्कल्लोळ
घातलास
आणि दाखावलिस
तुझी दहषद
किती ते
पण मी
असा नाही
मला कमजोर
समजू नकोस
तुझ्या हुन मी
जास्त घातक आहे
तुझा देखिल
प्राण घ्यायला
मागे पुढे
पाहणार नाही
तुझ्या रक्ताच्या
चिरक्या उडविन
म्हणुन माझ्याशी
सांभाळुन रहा


एक चेतावनी ...वा~याला



सूर्य

आज तू माझ्या सोबतीला
का आहेस ?
सोड ना मला
जावू दे कुठे तरी लांब
तुझ्या पासून .....

असा ही दिवस
येइल की तूच मला
सोडून जाशील आणि मी
काहीही करू शकणार नाही
तेव्हा मला तुझी याद येइल
जरी आली
तरी तुला बोलावनार नाही रे

सूर्य

तुझी दुनियाच अजब गजब
तू ला माहीत
नसेल कदाचित
पण मी ती
अनुभवली आहे
आज .....आणि तुला सांगतो
तू सावध रहा
आता पासूनच
नाही तरी तुझ्या शिरांत
वाहणारा प्राणवायु
संपेल .आणि तू काळवंढशील रे


सूर्य

फिकिर

माझ्या शी शरियत
करतो काय ?
तू नाही जिंकू
शकत रे
नको तिथे तू
ओला पडलेला असतोस
आणि हवा तिथे सुका
मी खाली राहतो
जमिनीवर आणि तू
वर जास्त प्रमाणात
आपने मिलन होते पण
कसे
सुके सुके
तू मला सोडशील
एकदा पडेन पड़ें
पण तू मायेची ओन्झळ
करुण मला सावरशील
म्हणुन मला फिकिर नाही कसली



सूर्य

तुझी निर्मिती कशी झाली ?
हे जरी एक गुपित
असले तरी तुझा
ह्रास कसा होइल
हे उघड आहे
मी तुला मारणार नाही
पण तुझ्या चिंधडया चिंधडया
उडविन ...हेच खरे


सूर्य

आपटलोच तुला
सरळ कापत सुटलो
आडकलो
फिरलो
गुंडाळलो

आणि
चवटाळलो
एकच आरोली मारली
आणि तुला ती
कापत गेली
अगदी माधो मध्
तू छाटला गेलास
तेव्हाच
आता तरी
मान्य कर


सूर्य

रुतलो खोल वर
आणि तुला
दिला शत्रु पक्ष्याचा
वीडा उचलायला
तू येशील आणि उच्लशील
हे भाकित सत्य आहे

पण ते नगण्य
शोध घेन्या परी काहीच नाही
तू असाच येशील
एखाद्याच्या
खांद्यावर
ओझं
देवून
त्याच्या डोक्यावर

कावळ्याने चोच मारावी
तसा



सूर्य

रडलो कधी
जर
आयुष्यात आता परत
तू ये ,
तू ये ,
तू ये माझे
डोळे पुसायला
तुला नाही
म्हननार नाही
पण स्वताचा
विचार कर
माझ्या रडन्याने
तुला काही
त्रास नाही
होणार ना

तुझी काळजी वाटते



सूर्य

आज आला
वा~याचा आवाज

एइकुन फिरलो
उलटा मी आज

काहीतरी सांगणे
होते त्याला मला

सांगनेच विसरला
का रे तू रे मला

म्हणाला तो मला
गरम होते ज़रा

पंखा तुझा फिरव
माझ्या कड़े खरा

मी म्हणालो
जाशील उडून
हाथ पाय तुडवून
जावू नको उखडून
ठेव मला पकडून
पंखा देतो झाडून

तुला होइल गारवा
तू गाशील मारवा
उदय येशील का परवा


सांगेन केले मी माझे
आनंदी झाला तो ही आज
अडला तो मला
म्हणे करू नको माज

मित्र म्हणुन मला
खुप सतावले
नाही आज मी तुला हवाही देत
निघून जातांना हेच बतावले


सूर्य

तू आज येणार होतास ना
उसळ्त्या ,उफ़ाळत्या
लाटां सोबत

मग काय झाले त्याचे ?
का असा परत फिरलास?

मी तुला भेटण्या साठी
आतुर झालो होतो
आणि
तू तुझा मार्ग
बदललास
पुन्हा कधी तरी ये असाच
मग भेटुया

.

निवांत


सूर्य

तुला माझेच घर
भेटलं होतं
उध्वस्त कारायाला
भेटायला आलास खरा
पण चुकीच्या वेळी
चुकीच्या ठिकाणी
मी होतो रे तुझा मित्र
म्हनू तुला सावरून घेतले
नाहीतर
लाथ मारून
बाहर काढले असते
तूझ्या सकत लाटेला ही
त्या सागर किना~या पर्यन्त
..
मग बसलो असतो
शांत निवांत

एका कोप~यात


सूर्य

आलास ...
आहा आलास का विचारले..?
नाही म्हणून माझी
फजीती करू नको
म्हणजे झाले ..
बरं झाले तू आलास
नाहीतर मी एकटा होतो
रे इथे
खुपदा मी असाच विचार करत होतो
तू कुठे राहतोस
कधी येतोस ..कधी नाही
नक्की तुझे काम कुठे चालते ?
तू मला तुझ्या
बद्दल काहीच सांगत नाहीस
तरीही मी तुझा पत्ता लावतो ..
आता मी लावतो का ?
तू माझा पत्ता लावतो .
हे देवच जाने ..
देव कसा जाने रे
ही गोष्ट तर आप्ल्यात्लीच आहे ..
मग तूच लावतो..


सूर्य






माफ़ कर ग सोना.....


आय्च्या गावात
नि बाराच्या भावात
खुप दिवसानंतर
मला माझी सोना दिसली
एक मूल खाली
हाथ धरून चालत होते
आणि एक कडेवर
असलेले ते मूल
खुप सुंदर आणि गोजिरे
पण बेवारशी ...कारण
कालच माहीत पडले
तिच्या नव~याने तिला सोडले
घटस्पोट झाला ......
आणि त्यात तिने love marriage केले होते
त्या बेवड्या सचिन शी
मी नाही म्हणालो नव्हतो पण
अजुन थोड़ा वेळ आहे
असे सांगुन तिला दोन वर्षे
थांबवले होते ...(लग्नासाठी )
पण नाईलाज .....

काल भेटली
सोना कैसी हो ?
मै ? मजामा
अ ग अजुन मी गुजराती शिकलो नाही ग
माझा प्रश्न ..मी विचारला
मग काय विचार केलायस आता ?
ती दबक्या आवाजात म्हणाली
"काय पण नथी "
का?

माझ्या वर विश्वास नव्हता का तेव्हा ?
आवु काय पण नथी संदीप ..
पण मारा पप्पा
अ ग मराठीत बोल ग ..!
नाही तर हिंदी ....!

तुम्हे पता नहीं ..
मेरे पप्पा ने शादी जब्बरदस्ती करवाई
मै ना केह रही थी ..
तुम्हे फोन भी किया था !
पर तुमने कहा छुट मत बोल.
पर मै सच केह रही थी ..

हां अच्छा ...तुझ्या लग्ना नंतर
मला माहीत पडले की तू
राज्श्थान मध्ये जावून लग्न केलेस ते
आणि तेहि love marriage .
मग ह्या पोरांना कुठे घेवुन चालालिस ?
मी म्हणालो "इयाच्च नाकि दोना"

ती ने रागाने माझ्या कड़े
पाहिले आणि रडत रडत निघून गेली
मला समजले नाही ती रडत का गेली ?

पण मग विमल भेटला
"विमल भाय इया आवतो "
मने एक बात बाताओ यार

बोलना ...
अ रे दोस्त मैंने एकजन को बोला
"इयाच्च नाकि दोना"
इसका मतलब क्या हूवा
"इथे ठेव ना" असाच ना
.
अबे बेवकूफ नाही
ऐसा नहीं बोलनेका ना... ऐसा बोलनेका इया मुकी दो
मग नाकि दो म्हणजे काय ?

फेक दे ..
मलाच माझ्या थोबाडीत
मारल्या सारखे झाले ...मला तिला म्हणायचे होते मुलांना
माझ्या घरी ठेव
पण मी म्हणालो
मुलांना फेकून दे ..

आणि माझे अश्रु मोकळे झाले
त्यांच्या वाटा
सरळ झाल्या आणि डोळ्यातून
खाली गालावर येवू लागले

माफ़ कर ग सोना ....माफ़ कर ग सोना
याचाच जप करत होतो मी ...रात्र भर

सूर्य

"जा रे भिका~या "


माझ्या रक्तात विर्लेले एक एक क्षण
उसवत असतो मी
माझ्या तोंडाला सुई दोरा घेवुन
शिवत असतो मी

तूच म्हणाली होतीस ना .
मला तुझे काही एइकायचे नाही
मला तुझ्यात एकंदर
मिसळयाचे नाहीच नाही

अच्छा ......ठीक आहे

बघ आज मी अचट विचट रुपात
फार कुरूप दिसत आहे
तुझ्या सावली पासून दूर पण
उन्हात्त उभा आहे

माझ्या अवस्थे कड़े पाहून मला
कोणी भिक ही देत नाही
मला भिकारिही त्यांच्या समूहात
जागा करुण देत नाही

मी असा झालो ते फक्त तुझ्या साठी
तुझ्या एका शब्दा वर

"जा रे भिका~या "

आज मलाच माझा हेवा वाटतो
हेच तुला मी कळवतो ..
आणि जगाचा निरोप घेतो


सूर्य

==तू==


तू मनाची प्रेरना
तू मनाची वेदना
भावना मनाची तू
तू मनाची संवेदना

ओठ बालगोट तू
सारा सार विचार तू
तू अंतरातील कामना
कल्पवृक्ष आचार तू

तू सूक्त श्रुंगारिका
तू मुक्त सुवासिनी
शब्दरूप गझल तू
तू मन वृत्त कामिनी

लक्तरी प्रकाश तू
स्वप्न भंग याद तू
तू मनाची घाळ मेळ
एक माझी फ़रियाद तू


सूर्य

न कळत त्या वळनावर


न कळत त्या वळनावर मी थांबलो
अन तुझी याद आली

न कळत त्या वळनावर तू थांबलिस
तुला माझी याद आली ?

न कळत त्या वळनावर पुन्हा एक
फुल उमलले

न कळत त्या वळनावर पुन्हा तुझेच
नाव आले

न कळत त्या वळनावर भेटशील
मला पुन्हा

न कळत त्या वळनावर अजूनही
मी तिथे उभा

न कळत त्या वळनावर श्वास
माझे थबकले

न कळत त्या वळनावर पारवे
माझे उडाले

न कळत त्या वळनावर उदास मन
हसरे झाले

न कळत त्या वळनावर माझे प्रेम
पुन्हा मिळाले


सूर्य

पहचान परछाई


जाने अनजाने तू मुझसे
मिल गई

मै तुझसे खफा तो नहीं
मगर तुम

मुझसे प्यार मत कर बैठना
मै तो

सूरज की रोशनी में आता हु
और तुम

श्याम ढलतेही चली जाती हो
परछाई की तरह

अब मै तुम्हे पहचान नहीं सकता
क्योकि ..?



क्योकि ..?




तुम खिसकती हो परछाई की तरह
अपनी पहचान छुपाये


शायद मै तरसने लगा था
तुम्हे मिलनेको

मिलने की आस लगाए बैठा था
किसी कोनेमे
किसी काली छाया की तरह
तुम पास से हो गुजरी हो
पता तो नहीं मुझे क्यों
पर ऐसा लगा जरुर
की वो और कोई नहीं तुम ही हो
जो हर वक़्त मेरा
साये की तरह पीछा करति हो
वर्णा मै तो तुमसे ...
बिछड ही गया था
की सी अंधियारी कोठारी में
मै जब अकेला था
तब मै तुम्हे याद कर रहा था

बहोत देर से तुम यही खडी हो
तुम्हारे घुटनोमे
दर्द तो नहीं हो रहा
चिंता सी लग रही है
पर क्या कहू मै तुमसे
तुम तो मेरी बात
समझ ही नहीं पाती हो
काश कोई हो जिससे मै
ये कह सकू की तुम
कभी मुझसे नाराज थे ..?

नहीं जवाब आया
तो मै समझ जावुंगा
तुम्हे
मुझसे कोई गिला शिकवा नहीं
मगर
ये जरुरी है की
अपनी
सीमा मुझतक मत पोहचने देना

तुम मेरा जो ख़याल रखती हो
उसका एहसान तो
मै कभी चुका नहीं सकता
मगर तुम बड़ी ही समझदार हो

दूर से ही जाने का इशारा कर देती हो
पर क्यों ?

मुझ पर यकी नहीं ...
समझो जो दो दिलोंके
बिच होता है ..
यही आपस इ रिश्ता
मै बनाने नहीं दे रहा हु

तुमसे
हा तुमसे ...लो आज तो हद हो गई
तुमने जो मेरे
दिलपे घाव किया है
उसे मै क्या
कोई भी नहीं मिटा सकता
पर ..

ये मेरी प्यार की
निशानी नहीं है
तुम गलत मत समझना
...
यही दुनियाका दस्तूर है
तुम्हा रे लिए
और मेरे लिए ....



खुलके ..जीने का आंनद लेना होगा तुम्हे
तुम्हारी गहराई
और तुम
कभी आपसी झगडे में मत खो जाना

यही नितिमत्ता है

अगर मै कभी साथ
झोडदू तुम्हारा
तो तुम
अपनी हस्ती बचाए रखना
अनन्त काल तक
वो तुम्हे मेरी याद दिलाएगा
जो की मै हु
एक सूर्य (सूरज )
जिसके होसले बुलंद है
कोई भी उसे छु नहीं सकता
फिरभी
उसे पानेकी
आशा रखते है सब
और तूम मेरे प्यार में
खो जाती हो
..
कोई बात नहीं
कभी किसी कम नमी के छत में
तुम मुझे
देखा करो मै तुम्हे
इसी तरह
दिखता रहूंगा
तुम्हारे करीब

आँखे बंद हो ने की कगार
पर
.तुम्हे जब मै नजर आवूंगा
तब ..
अपना होसला मत खोना
मै तो
चला जावुंगा पर तुम अपना
साम्राज्य
बढाना


नजर अंदाज होके
हमसे कितने दूर जाओगे
ये तो आप भी बता न पायंगे
पर
हम आपसे एक सौदा करना चाहते है
हमसे जो दुरी आपने बनायीं है
उसे क़यामत तक
निभाना ..
यही
हम अपना फर्ज समझते है

कागज़ की कश्ती
जब पानी में डूब जायेगी
तब हमें एक आहट सी सुनाई देगी
जो की आपकी एक चिंगारिसे
जलते हुए हमारे दिल के पास
आजायेगी ..

हम किसी पेड़ की छाओ में न जायेंगे कभी
आपकी रह्गुजार याद हमें तड़पायेगी व़हा
..
या अल्ल्ह्हा ..

आपका रात का साम्राज्य
हमें कुबूल है
काली परछाई जब तक है ..
हम व़हा जा नहीं सकते
आपका कुबूल नामा
हमारे हतेली पर
जब तक है
तब तक आप
और हम
इसी इंतजार में रहेंगे
..
जब मै आपके अन्दर समा जावुंगा
तब काबुल नामा कुबूल
कीजी येगा
हमारे हथेली का
कोई आवाज न आएगी
नाही आंधी आएगी
नाहि कोई चमत्कार होगा
आपकी परछाई ..
जरुर आएगी ये हमारा आपसे वादा है

सूर्य

जर मी चोर झालो....


मित्रांनो मी १० वित् असताना ही कविता केलेली ...
आज ब~याच दिवसांनी मला भेटली ..म्हणुन पोस्ट करत आहे
शिक्षकांनी विचारले .
मी कोण होणार ? यावर निबंध लिहून आना ...पण मी कविता लिहली
आणि शिक्षकांचा खुप मार खाल्ला ८/७/२००३


जर मी चोर झालो


सर्वाना वाटते की
कोण तरी व्हाव...
मला ही वाटते मी खुप
मोठं व्हावं....

सा~या जगात माझं नाव व्हावं..
सा~रा जगानं मला घाबरावं...
.
जर झालो मी चोर
तर काय करेन ?
प्रश्न माझा मोठा
तुम्हा का सांगेन ?

मोठा चोर होउन
खुप पैसे कमविन...
काळा धन सारा
चांगल्या ठिकाणी वापरिन...

सर्वात पहिले मी
स्वताचे आरमार बनविन....
सा~या जगाला माझ्या
पुढे नमविन ......

करीन कमाई भरघोस अशी
बांधीन इकडे तिकडे मक्का अन काशी

मग नाही राहणार
कोण हिंदू कोण मुसलमान ?
नाही मरू देणार
कोणाचं ईमान ..

नेता मला असे करू देणार नाही
पण मी स्वताला असे हरु देणार नाही

मी मोठा चोर होइन
मी मोठा चोर होइन

चांगले आता सारे हे लोक करू देत नाही
साधा सुधा म्हणुन राहू देत नाही

म्हणुन



मी मोठा चोर होइन
मी मोठा चोर होइन .......


सूर्य

करा कर्म चांगले...


अवती भवति सारेच शत्रु
मित्र म्हनू मी आता कुणाला

करती धरती सारेच पाप
पुण्यात्मा म्हणु मी आता कुणाला

कोण कबीर इथे कोण संत आहे
कोण तुकोबाचे गात गीत आहे

कोणता वाहतो इथे झरा आहे
पापाचे झरा कोणता इथे खरा आहे

लोभा पासून कोण वंचित आहे
माया सारीच काळि संचित आहे

कोणती भावना माणूस आज खेचित आहे
यम् तो ...यम् तो आपलाच काळ वेचीत आहे ..

करा कर्म चांगले आता कोण तुम्हा अडवित आहे
आयुष्य हे सुखी करा..
आत्मा हेच आजवर बड-बडित आहे


सूर्य

सावलीची सावली...


सावलीची सावली सावालिशी बोलली
तू माझी का मी तुझी ?तू कुठे चालली

आताच ज़रा चाल अशी अजुन रात झाली नाही
उजेडात तू माझी ..तूच मला भावली

सारेच असे पाहतेस ,पण का असे म्हणतेस तू ?
मी तुझी कायाच नाही, तूच मला पावली

रूप तुझे साम्य माझे कोणता फरक आपला
कसे सांगशील कोण तू सावली का मला भावली

सूर्य तुझा का माझा गेला असता घात करतो
सांगशील का हे ज़रा .
सावलीची सावली सावालिशी बोलली ...

सावलीची सावली सावलिशी बोलली
परले ते सारेच उगवते असे नाही

सावलीची सावली सावलिशी बोलली
पडताच भांडे आवाज सा~यांचा येत नाही

सावलीची सावली सावलिशी बोलली
केलेच प्रेम कधी कुणाशी सारेच सफल होत नाही

सावलीची सावली सावलिशी बोलली
तू माझी किव्हा मी तुझी सावली सावलीची होत नाही

सावलीची सावली सावलिशी बोलली
उजेडात तू हो माझी मी तुझी साथ देइन..असे नाही


समजले म्हणुन बोलली सावलीची सावली
सावलीची सावली सावलिशी काही न बोलली ...


सूर्य

कधी भोगलेच नाही .....


झोपलो मी असाच एकदा
अन कधी उठ्लोच नाही


सारे चिंता करू लागले...
जे मी कधी भोगलेच नाही


दुःख माझे मला कळाले
ते कधी लपलेच नाही

हसत मुख मी असाच राहिलो
अश्रुंनी ते कधी भोगलेच नाही


मरणाच्या आकांताने
असे हे हसू फुटलेच नाही

मरण म्हणजे मलाच काय
देवाने ही ते भोगलेच नाही


शब्द कधी मला विचारतात
तू मन्हस्ताप कधी पेललेच नाही

शब्दा वाचून मी भिकारी
अमीर पण कधी भोगलेच नाही

झाड़ माझे कधीही सुकेल
पाउस वारा कधी पचलेच नाही


झोपलो मी असाच एकदा
जागने मी कधी भोगलेच नाही



सूर्य

चाल ...

आज तुझा
हाल झाला
बेहाल
ती
तुझी नाल
होवुनी ताल
तू ज़रा चाल
अ रे गड्या
चाल

वाट तुझी
नख~याची
सोबत
पाखरांची
आसमंत
सारा
होइल ढाल
तू ज़रा चाल
अ रे गड्या
चाल

विश्वास तुझा
तुलाच हवा
बन तू
बेडर
ओरडूनि चाल
आज वर
कर मान
करुनी
तुन-तुनात
चाल
अ रे गड्या
चाल

हाय
फसलास कुठे ?
मातीत तुझ्या
तू उजळुनि
टाक ..
पावुल तुझे
आकाशी
तू लपेट असे
चक्राकार
चाल
अ रे गड्या
चाल

बडव तू
शब्द तुझे
कर
टोकदार
तापव भट्टित
मग
कर शिकार
आन तू पार
विजय तुझा
करुनी चाल
अ रे गड्या
चाल

पुढे तर चाल
तुझी
तू चाल ...


हाय हाय
ढोल
पिटतो ढोल
झालाय गोल
तरी ही तू
बोल
चालवी
चाल तुझी
तू चाल
अ रे गड्या
चाल

हाती घे
मशाल
ही रात
तुझी
वेताळ
स्वप्न तुझी
ती शाल
पांघरोनी चाल
तू चाल
अ रे गड्या
चाल

सुसाट चल
बेभान चल
धुंद तुझी
तू हरव ज़रा
हो मोकाट
सूट बेभाट
तोड़ सारे
तू विशाल जाळ
तू चाल
अ रे गड्या
चाल


किलबिलाट कर
बिल बिलट कर
तू चल पुढे
वास्तव्याशी लढ
फिरर्तेय चाल
घळघळात कर
पळपळात कर
सारे जतन
करत तू पुढे
चाल
तू ज़रा चाल
अ रे गड्या
चाल


क्षणों क्षणी
हा बढे उभार
डोक्यात
तुझ्या
कीडे पसार
शांतित घे
आवर ज़रा
तू स्वताहाला
प्रश् तुझे
तू बोल
तू ज़रा चाल
अ रे गड्या
चाल


सूर्य

!!=ह्रदय सुर=!!.......गजल


वृत्त--...-भामिनी
मात्रा------१७

गालगा गालगा गालगागा


काल मी काल तू भेटलेलो
हो तुझ्या सोबती पेटलेलो

भार माझा असा पेललेला
जागच्या जागी मी खेटलेलो

सांग आहेस कारे तिथे तू
चेह~याने नवा वाटलेलो

कोण आला इथे मान रोगी
वाटलो मी जरी सूटलेलो

झोपलो ,जागलो सांग कोठे ?
पाहिले का मला ऊठ्लेलो

चेहरा सावळा का कसू मी ?
वाटतो का तुला नटलेलो

आग ही अजुनी विझलेली
पेटवू का जसा चेटलेलो

सुर माझा मिळाला कुठेरे
दिसलो मी तुला फाटलेलो

सूर्य

मागतो मी :एक गजल


वृत्त=मनोरमा

गालगागा गालगागा
मात्रा---- १४

पावलाला जागतो मी
चालने ही मागतो मी

पाय माझे भाजलेले
कोळ्शाला मागतो मी

आज सूर्य तापलेला
घाव त्याचे मागतो मी

सागराशी वैर माझे
प्राण त्याचे मागतो मी

अंबराला साकडे मी
घातलेले मागतो मी

जीवनाने पाहिलेले
सुख माझे मागतो मी

ज्ञान माझे लोका पुढे
वाढले ते मागतो मी

मान माझी कापलेली
छाटलेली मागतो मी

एक आस लागलेली
गुरु माझे मागतो मी


सूर्य .

माझी संध्या .....


तू मला विसरलीस
असे वाटले ग
पण मी पण तुझ्या शेजारी आलो
राहायला ..

तुझ्याच गावात
आणि तो ही तुझ्या नकळत
ब~याच वर्षांपासून
तुझ्याशी बोलण्या साठी
मी उत्सुक होतो
आज तो दिवस आला ..

आणि मी फोन केला
तेव्हा ...
तू मला अनोळखि वाटलिस
मी तुला म्हणालो की मी बोलतोय
तेव्हा कोण मी ?
म्हणुन तूच विचारले होतेस....

काही तरी खून मागितलिस आणि
मी पटकन म्हणालो
..जे वाक्य आपण ४ वर्षं पूर्वी ऐकले होते तेच
"ताई आता तुझे नाव मम्मीला "
पण तुला नाही समजले
आणि मी त्याचा खुलासा केला ..

आपण तुझ्या घरात
दरवाजा न लावता
एकाच पलंगावर
उताने पडलो होतो
माझी नजर तुझ्या डोळ्यात
आणि तुझी नजर लाजेने
खाली पाहत होती

"टिव्ही" चे कार्यक्रम
संपले होते ..

आणि तुझ्या अंगावर
मी चादर सावरत उठलो

तुझी नजर दरवाज्या कड़े वळलि
आणि
अचानक एक आवाज आला
"ताई आता तुझे नाव मम्मीला "
तो सचिनच होता ...तुझा लहान भावु

आणि हेही मला माहिती आहे
पण तूच रागावलीस माझ्या वर नंतर
आणि मला सोडून गेलीस का ?
का ?

संध्या ....तू अशी नाहीशी होशील माझ्या जीवनातून
असे कधी च वाटले नव्हते ग .....



सूर्य

माझ्या डोळ्यात तुझे अश्रु गहाण ठेवशील का ?


तुझे ओठ ...माझ्या ओठावर येतील
अन माझे मन कावरे बावरे होइल

अश्या वेळी मला घट्ट आवळुन तू
माझ्या कवेत स्वर्ग सुख घेशील का ?

फुलांची रास ...तुझ्या गालावर देइन
अन एक थेंब तुझ्या गालावर येइल

अश्या वेळी मला बिलगून घेवून
ह्रुदयात एक स्वतःचे घर करशील का ?

एक कोपरा तुझ्या हवाले अन एक माझ्या
असे दोन वाटे करुण देशील न मला

तेव्हाच तू माझ्या ह्रुदयात राहशील
अन तुझ्या ह्रुदयात मला ठेवशील का ?

हृदयाला तडा जाण्या अगोदर खबरदार
तुझे स्वप्न मी मोडू देइनच कसा

डोळे तुझे तू जप पण मला त्यात जागा दे
माझ्या डोळ्यात तुझे अश्रु गहाण ठेवशील का ?


सूर्य

सूर्य


वृत्त----लज्जिता
गालगा गालगा लगागागा
मात्रा--- १७

आणला सूर्य मी जरी आता
तारका शोध तू परी आता

सांगतो राज हा नभी तारा
जागला का कधी वरी आता

पेटतो तो कसा असा सारा
झाकतो आज मी तरी आता

आग ओकून हा थके नाही
सापळा लावला खरी आता

येथली भ्रांत का पड़े कोना
झोपलो मी उशी वरी आता

सूर्य

(दिया मिर्झा )


पूर्ण आकाश जसं
मोकळं व्हावं तसच वाटतय
बेफिकिरी संपून
आज पुन्हा कामाला
जावं असच ...

नको नको ति स्वप्न
पाहायची घानेरडी
सवय ..साली जाणार तरी कधी ?

दोन घोट समजुन
पूर्ण पावशेर ढोसुन आलो
म्हणुन ..आई ने घरात घेतले नाही
म्हनली आज घरचं दार बंद
मग काय आपल्या रोजच्याच जागेवर
काळु बाईचा..विहिरीचा कठडा
त्या शेजारी असलेला एक बाकडा
पण तो पण
मोडलेला...
बाजुला कचरा पेटी
म्हणुन विहिरिवरच आडवा झालेलो
स्वप्न खुप पाहिली
पण आजचे स्वप्न काहीतरी
वेगळ्च होतं

स्वप्नात चक्क दियाला पाहिलं (दिया मिर्झा )
माझा हात तिच्या हातात
आणि तिचे डोळे माझ्या डोळ्यात
भिरभिरत होते..

असाच पाहत राह
असाच पाहत रहा
हेच ति सांगत होती ..
हे कानाने ऐकत होतो.
आणि तसाच झोपेत
गेलो खाली
खाली
खाली

अजुन खाली
तिचा आवाज येत होता माझ्या कानात
मला पाहत होती तिची नजर
.
.
.
आणि जोरात आवाज झाला
रात्री ३ वाजेच्या सुमारात
मी विहिरीत आपट्लो
आणि माझ्या सोबतीला तो आवाज
मला विहिरीत खेचत होता
कसा बसा रहाटाच्या रश्शिला धरून बाहेर आलो
आणि ..तसाच राहिलो .
नशा उतरली होती ...
पण तिची नशा
डोळ्या समोरून जात नव्हती


अजुन ही तशीच आहे

त्या विहिरीत ..म्हणुन
जेव्हा पावशेर भेटते ..
त्या विहिरीच्या बाजुला
जावून तिच्या शी गप्पा मारतो

ते गूढ़ आज उलगडले
१० वर्षा पूर्वी एक दिया नावाची मुलगी
विहिरीत पडलेली ....

आणि आता मी तिला पाहतो..
पावशेर टाकल्या नंतर

का ते कुणास ठावुक ?


सूर्य...

दिया मिर्झा =एक गझल


एक छोटासा प्रयत्न ..माझ्या दीया मिर्झा या कवितेतुन सुचले...

"मनोरमा"

गालगागा गालगागा
मात्रा---- १४

माज कूणा येत आहे
अन् मि झोपेत आहे

बावळा पाजा निरा ते
दारु कोणी पेत आहे

आस नाही प्यास आहे
ध्यान कूना नेत आहे

गीत हे कोणी गयीले
अंतरी तो जात आहे

दीसते दीया मला ती
बोलवीते आत आहे

राखतो नीशानि तूझी
वारुनी कंठात आहे

सूर्य

दोन घोट....


नको नको ती नशा
तोंडाला लावायची सवय झाली
नको नको त्या घोटात
आनंद असतो म्हणुन ..

कसला ?

आज मला तिने विचारले ..

सांग ...सांग आणि सांगच....

दोन मिनटे शांत झालो
डोक्यात प्रकाश पडत नव्हता
पण
सांगणे भागच होते..


ती दिसत होती अंधुकशी
सांगू तरी कसे ?
खुप दूर भासत होती...
उन्हात तपत्या पत~यावर
ज्या प्रमाने वाफा दिसतात
तशीच ...
गरम पाण्यात ..भिजलेली

म्हणुन अजुन दोन घोट मारले

आणि ..
आणि ..
तिला म्हणालो
आता खुप छान दिसतेस


सूर्य

बहाना ......


आज असाच
कोप~यात बसून
एक बाटली मारायची
असा विचार करत
घाबरत घाबरत
झाकण खोलत होतो ...
इतक्यात माझा
फोन वाजला .
हेल्लो हेल्लो
आवाज येत नाही
नंतर फोन करा ..


आतून पूरा उतरलेलो मी त्या बाटलित
बाटली रिकामी करायची
आणि टूल्ल व्हायचे
आपल्याच नशेत
पण ..मग मेसेज आला
आणि पुन्हा फोन वाजला
you have a message गुडू गुडू गुडू

तो पर्यंत अर्धी बाटली संपवली
आणि खिशातून फ़ोन काढला

तर दादाचा message
Dada
babu aaple mama vaarle
aailaa saang lavkar gaadi pakad

माझी नशा उतरणार
म्हणुन पूर्ण बाटली संपवली मी
आणि तर्राट झालो ..

मग काय अजुन एक बहाना
भेटला
अजुन एक बाटली ...
उतरवण्याच्या शोधात
टूल्ल
होण्या साठी...

कालची अजुन उतरली नाही
म्हणुन सरबत वाल्या कड़े गेलो
लिंबू देर एक ..
तुझ्या आय्चा भैया "
भो XXX
तुला राहायचे हायना
तो लपल्या आवाजात म्हणाला
"येलो "

साला भाड़ खावु

पैसा घेना
फुकट मागतोय काय ?
साल्या माझ्याच जमिनीवर
उभा राहून मलाच देत नाय
जा नाय देत पैसे ....!

त्याच्या तोंडातून एक शिवी आली
माँ XXX
कहा कहा से आते है ..!

तसास तडक़लो मी
आणि एक लावली कानाखाली
तेवढ्यात अजुन दोन भय्ये आले
आणि माझा पुरा हाल खराब केला
चार लाथा आणि दहा बारा गुच्छे
खावुन शर्त फाटले .
पैंट चिखलात लोळलि..

आणि मी अर्धमेला झालो
खिशात चोवीस रूपये होते
अजुन एक बाटली घेतो
आणि मग ह्याला बघतो साल्या
भैय्या..


सूर्य

Saturday, November 21, 2009

फुकनी ....


धुर फुकायचो
केव्हातरी
गपचुप .पण आता
लहर आली की
कधी ही .....

अशीच लहर
बिडिची...सिगारेट जमत नाही ..

म्हणुन २ रुपये भेटले
की खुश असतो

आधी मागायला
लागायचे ..ये रव्या आज तू पाज
उद्या माझी बारी
साल्याला GOLD FLAKE
हवी
म्हणुन लगेच तैयार व्हायचा

मी त्याचा बाप
पैसं न्हाय हायत ...
काम दे काय बी
करतु
पण बिडिची तलब हाय ...
विहीर खोदायला सांग ना मग ..
एका पायावर (बिडिच्या बण्डल त्या बदल्यात )
उभा आहे .
कारयचो मग काम
फुकत फुकत

आज ही तेच चालु आहे


म्हणे आदत ख़राब असते
सिगारेट ची
मी काय म्हन्तु पण
एकदा ओढायला
काय हरकत आहे ?
घेतली एकदा हातात...
आणि मरला दम ..

हा............ठंडक ..ठंडक ..
आणि जो ठसका लागला
आवाज च गायब झाला
दोन महीने
मुक्याचं सोंग घेवून
घरात राहत होतो
माझा घसा पण
बेवारशी सारखा
खोकलत होता ..

आणि मी चिंतेत
आवाज गेला कुठे ?
येइल का ?
नाही आला तर ?
कोणाला सांगू ?
सांगू तरी कसे ?
अनेक प्रश्न डोळ्यात
डोक्यात
कपाळात
आट्या पड़े पर्यंत ..
पाणीच पानी ...
म्हणुन रडून रडून हैरान
आणि आता एकच
उपाय
बिडिच बरी ..
शिवाजी महाराज की जय
म्हणत ..मारला पुन्हा दम
सारा धुर आत गेला
गला कसा मोकळा झाला
आणि एकदाच ओरडलो
जोरात ...जसा मौन तुटतो तसा


सूर्य