Saturday, November 13, 2010

सवेरा..




मै नहीं आइनेकी तरहा पाक
जो अपने कदम संभालकर चलू
मै उस रोशनी की इक किरण हु


जिस किरण से सवेरा होता है ...






सूर्य ....

असे कसे ती


असे कसे ती बोलुन गेली
हवे नको ते कोरून गेली

कधी खुला आकाश पहातो
मनात तारे ठेवुन गेली

किती मनाचा सर्व पसारा
ठिकान त्याचे दावुन गेली

सुरु कथा ही आजच झाली
दिवा परी अंधारून गेली

पडायचे प्रेमात न होते
दुखायला ह्रुदयातुन गेली

फुलायचे होते नजरेने
मिटून डोळे पाहुण गेली

लहानश्या माझ्याच जगाला
मिठीत त्या कवटाळुन गेली


सूर्य

Thursday, November 4, 2010

तोटक ...




कमळात जसा भवरा असतो
नयनात तसा गहरा असतो


मन चंदन आत जरी असते
वरचा भरजर नखरा असतो


नुसते कसले भय आज मला
दडपण मनचा पहरा असतो


अवकाश जरी लवले नसते
धरतीस बळी बकरा असतो


मकरंद कधी फुलला असता
गुलमोहर त्यात खरा असतो



सूर्य ...


(तोटक)
ललगा ललगा ललगा ललगा [मात्रा--१६]