Thursday, September 30, 2010

निरंकार (गझल)


दुःखाचा तुझा भार मला दे
मोत्यांचा तसा हार मला दे


प्रेमाला जसा मी उपरा हा
मायेचा तु आहार मला दे


वेडा वाकडा वाटत आहे
मूर्ति मंत आकार मला दे


कोमेजायला मी फुल झालो
पारावार श्रुंगार मला दे


भेटू पाहतो सतगुरु आता
अविनाशी निरंकार मला दे



सुर्य...

Sunday, September 26, 2010

मानव..(गझल )

मानवाची जात आहे
पाय ही पोटात आहे

कोण माझा मी कुणाचा
आज ते आज्ञात आहे

पेटतो हा कोण येथे ?
ही कुणाची वात आहे

देव माझा मी पणाचा
अंतरी हां गात आहे

एक धागा विस्तवाचा
साप नाही कात आहे

चावली जी जीभ कोणी ?
आत तोही दात आहे

ना कळे माझे मला मी
कोणत्या जीवात आहे


सूर्य