Wednesday, October 27, 2010

आभार आहे..(गझल )


यौवनाचा भार आहे
का हवा ही गार आहे


पाहते नजरेत माझ्या
हीच माझी नार आहे


जखम ही माझ्या मनाची
आतला व्यवहार आहे


सत्य वाटे आज मजला
कालचा सत्कार आहे


मिथ्य नगरी राज्य माझे
आमचा संसार आहे


भेट होते चोरटी ही
हे तुझे आभार आहे



सूर्य...

किसीने सताया ..(गजल हिंदी )



किसीने सताया रुलाया नहीं है
मुझे क्या पता क्यों ?भुलाया नहीं है

जुदा हो गए आपसी साथ रिश्ते
घडी साथ चलके मिलाया नहीं है

रुकी है हवा आसमा चल रहा है
कहा जा रहे है ,बताया नहीं है

निगाहे हमारी तुझे ताकती है
अभी प्यार हमने जताया नहीं है

कभी आजमाना कभी छोड़ देना
कोई भी गुजारीश "जाया" नहीं है



सूर्य ..

मेल्या नंतर राख माझी....


मेल्या नंतर राख माझी सांड घरात ज़रा
उरली सुरली ओवाळुन टाक दारात ज़रा

तुळशी भोवती घालेन लोटांगण मी रोज
आठवण माझी आल्यास पहा ह्रुदयात ज़रा

चुक माझी आढ़ळेल ना रोज रोज दररोज
प्रेमाने रागाव ग प्रेमाच्या भरात ज़रा

चंद्र ,सूर्य सारे ग तुझ्या अंगनी येतील
प्रेम दाटून येईल तेव्हा भर उरात ज़रा

सुखावून मी जाईन जेव्हा तू मला स्मरशील
डोळ्यांनी मी पाहिन माझ्या तुझी वरात ज़रा


सूर्य ....

मी मला शोधले...(गझल )


मी मला शोधले खुप जणात
भेटलो ना कुणाच्या मनात

वस्तिला राहतो मी असाच
पाहता झोपलो अंतरात

चांदने उतरले ते कश्यात ?
वाचले तेच मी पुस्तकात

आयुष्याची मजा ही कश्यात
या चहाच्याच एका कपात

चेहरा सावळा वाटणार
पाहतो मी ज़रा आरशात

धीर गंभीर मी राहतो ग
राहुदे आजवर अंधरात

दोन डोळे असे झोपताच
स्म्रुतिची पावले वाजतात


सूर्य ...

रस्ता रस्ता चालत होतो


मी रस्ता रस्ता चालत होतो
चालत चालत बोलत होतो ..

या दगडाचा
कुणी ना वाली
ह्रदय अजूनही
याचे खाली
असाच माझा आवाज मी
गुणगुणत होतो ...

अंधाराची
भीती वाटते
घाबर गुंडी
किती दाटते
कुणास ठावुक मनात माझ्या
काय घोळत होतो ...

दूर देशी
कुणी राहते
माझ्या साठी
वाट पाहते
जाईन म्हणतो ,भेटेन म्हणतो
विचारात विरघळत होतो ..


सूर्य