Sunday, November 22, 2009

(दिया मिर्झा )


पूर्ण आकाश जसं
मोकळं व्हावं तसच वाटतय
बेफिकिरी संपून
आज पुन्हा कामाला
जावं असच ...

नको नको ति स्वप्न
पाहायची घानेरडी
सवय ..साली जाणार तरी कधी ?

दोन घोट समजुन
पूर्ण पावशेर ढोसुन आलो
म्हणुन ..आई ने घरात घेतले नाही
म्हनली आज घरचं दार बंद
मग काय आपल्या रोजच्याच जागेवर
काळु बाईचा..विहिरीचा कठडा
त्या शेजारी असलेला एक बाकडा
पण तो पण
मोडलेला...
बाजुला कचरा पेटी
म्हणुन विहिरिवरच आडवा झालेलो
स्वप्न खुप पाहिली
पण आजचे स्वप्न काहीतरी
वेगळ्च होतं

स्वप्नात चक्क दियाला पाहिलं (दिया मिर्झा )
माझा हात तिच्या हातात
आणि तिचे डोळे माझ्या डोळ्यात
भिरभिरत होते..

असाच पाहत राह
असाच पाहत रहा
हेच ति सांगत होती ..
हे कानाने ऐकत होतो.
आणि तसाच झोपेत
गेलो खाली
खाली
खाली

अजुन खाली
तिचा आवाज येत होता माझ्या कानात
मला पाहत होती तिची नजर
.
.
.
आणि जोरात आवाज झाला
रात्री ३ वाजेच्या सुमारात
मी विहिरीत आपट्लो
आणि माझ्या सोबतीला तो आवाज
मला विहिरीत खेचत होता
कसा बसा रहाटाच्या रश्शिला धरून बाहेर आलो
आणि ..तसाच राहिलो .
नशा उतरली होती ...
पण तिची नशा
डोळ्या समोरून जात नव्हती


अजुन ही तशीच आहे

त्या विहिरीत ..म्हणुन
जेव्हा पावशेर भेटते ..
त्या विहिरीच्या बाजुला
जावून तिच्या शी गप्पा मारतो

ते गूढ़ आज उलगडले
१० वर्षा पूर्वी एक दिया नावाची मुलगी
विहिरीत पडलेली ....

आणि आता मी तिला पाहतो..
पावशेर टाकल्या नंतर

का ते कुणास ठावुक ?


सूर्य...

No comments:

Post a Comment