Sunday, November 22, 2009

"गुलाब " ....

रंगातच आहे तुझ्या एक जग मोठं
सांगेला का कोणी तुला कधी काही खोटं
वा~यावर पसरतो तुझा रंग छान
आवाजात तुझ्या माझे टवकारतात कान
किती भोळी तुझी काया वाटते महान
प्रेमाचे तू बंदिश आहे आकाराने लहान
लाजवत लाजवत येतोस तु जेव्हा
हृदया मध्ये काजवे प्रकाशतात तेव्हा





सूर्या हुन तेज तुझे आहे दिपवान
तुझ्या खातिर प्रेमापुढे झुकतेय मान
लाल लाल रंगाचा बाजार तुझा फुले
तुला पाहून बहरतात फुलातिल मुले
कसे सांगू रानीला तुझ्या बद्दल सारे
तुला देवून तिच्या स्वाधीन मन माझे झुरे
मन तुझे मन माझे आहे एकसमान
हेच दिले देवाने आहे तुला वरदान






सुकतात पाकळ्या होते दुख मला
तरीही जपावासा वाटतोस फुला
सांगितली तुझी ही मला जीने कहानी
तीच होती तीच होती माझी एक नानी



सूर्य....

No comments:

Post a Comment