Friday, December 17, 2010

.... अश्या घडिची ....


अश्या घडिची साथ साजनी
भेट मला तू हीच मागणी ..

बागां मध्ये धूंडत होतो
फुलाफुलांत ही पाहत होतो
बागे मधली तू फुल राणी...

चिंतन करता मेघ गर्जना
वास्तवाशी भेट ह्या मना
बहरून जाईन ऐकून ही वाणी

शितल कोमल अंगावरुनी
पाहुन हसते रात चांदणी
न्याहाळ मजतु उघड पापणी


सूर्य ..

आजचे दिवस..

माझे राहत नाहित आजचे दिवस..!
येता जाता पुसतात आजचे दिवस...!!

कसा दुरावलो
तिच्या मनातून
का हरवलो ?
ह्या ह्रुदयातुन
पळताळत राहतो
मागचे दिवस ..!!

असा एकांती
पडून राहतो
थेंब डोळ्यातला
गळुन राहतो
आठवतात मग
सोन्याचे दिवस ..!!

(कधी अचानक )
उमटून जाते
नवे पावूल
हृदयाला होते
हृदयाची चाहुल
येणार असतात मग
पारावरचे दिवस..!!


सूर्य..

ओठ तरी (गझल )

ओठ तरी हलतातच माझे
सोन फुले फुलतातच माझे


साठवले गुलकंद मनाचे
स्वप्न असे पळतातच माझे


काय असा अवतार जहाला
ठार मला छळतातच माझे


आठवणी नुसत्या गुदमरल्या
अश्रु उगिच गळतातच माझे


मधुन असे वा~यावर कोणी
गीत मनी कळताताच माझे


रडत असा राहीन सुखाचा
भिजत नयन सुखतातच माझे



सूर्य ...

Saturday, November 13, 2010

सवेरा..




मै नहीं आइनेकी तरहा पाक
जो अपने कदम संभालकर चलू
मै उस रोशनी की इक किरण हु


जिस किरण से सवेरा होता है ...






सूर्य ....

असे कसे ती


असे कसे ती बोलुन गेली
हवे नको ते कोरून गेली

कधी खुला आकाश पहातो
मनात तारे ठेवुन गेली

किती मनाचा सर्व पसारा
ठिकान त्याचे दावुन गेली

सुरु कथा ही आजच झाली
दिवा परी अंधारून गेली

पडायचे प्रेमात न होते
दुखायला ह्रुदयातुन गेली

फुलायचे होते नजरेने
मिटून डोळे पाहुण गेली

लहानश्या माझ्याच जगाला
मिठीत त्या कवटाळुन गेली


सूर्य

Thursday, November 4, 2010

तोटक ...




कमळात जसा भवरा असतो
नयनात तसा गहरा असतो


मन चंदन आत जरी असते
वरचा भरजर नखरा असतो


नुसते कसले भय आज मला
दडपण मनचा पहरा असतो


अवकाश जरी लवले नसते
धरतीस बळी बकरा असतो


मकरंद कधी फुलला असता
गुलमोहर त्यात खरा असतो



सूर्य ...


(तोटक)
ललगा ललगा ललगा ललगा [मात्रा--१६]

Wednesday, October 27, 2010

आभार आहे..(गझल )


यौवनाचा भार आहे
का हवा ही गार आहे


पाहते नजरेत माझ्या
हीच माझी नार आहे


जखम ही माझ्या मनाची
आतला व्यवहार आहे


सत्य वाटे आज मजला
कालचा सत्कार आहे


मिथ्य नगरी राज्य माझे
आमचा संसार आहे


भेट होते चोरटी ही
हे तुझे आभार आहे



सूर्य...

किसीने सताया ..(गजल हिंदी )



किसीने सताया रुलाया नहीं है
मुझे क्या पता क्यों ?भुलाया नहीं है

जुदा हो गए आपसी साथ रिश्ते
घडी साथ चलके मिलाया नहीं है

रुकी है हवा आसमा चल रहा है
कहा जा रहे है ,बताया नहीं है

निगाहे हमारी तुझे ताकती है
अभी प्यार हमने जताया नहीं है

कभी आजमाना कभी छोड़ देना
कोई भी गुजारीश "जाया" नहीं है



सूर्य ..

मेल्या नंतर राख माझी....


मेल्या नंतर राख माझी सांड घरात ज़रा
उरली सुरली ओवाळुन टाक दारात ज़रा

तुळशी भोवती घालेन लोटांगण मी रोज
आठवण माझी आल्यास पहा ह्रुदयात ज़रा

चुक माझी आढ़ळेल ना रोज रोज दररोज
प्रेमाने रागाव ग प्रेमाच्या भरात ज़रा

चंद्र ,सूर्य सारे ग तुझ्या अंगनी येतील
प्रेम दाटून येईल तेव्हा भर उरात ज़रा

सुखावून मी जाईन जेव्हा तू मला स्मरशील
डोळ्यांनी मी पाहिन माझ्या तुझी वरात ज़रा


सूर्य ....

मी मला शोधले...(गझल )


मी मला शोधले खुप जणात
भेटलो ना कुणाच्या मनात

वस्तिला राहतो मी असाच
पाहता झोपलो अंतरात

चांदने उतरले ते कश्यात ?
वाचले तेच मी पुस्तकात

आयुष्याची मजा ही कश्यात
या चहाच्याच एका कपात

चेहरा सावळा वाटणार
पाहतो मी ज़रा आरशात

धीर गंभीर मी राहतो ग
राहुदे आजवर अंधरात

दोन डोळे असे झोपताच
स्म्रुतिची पावले वाजतात


सूर्य ...

रस्ता रस्ता चालत होतो


मी रस्ता रस्ता चालत होतो
चालत चालत बोलत होतो ..

या दगडाचा
कुणी ना वाली
ह्रदय अजूनही
याचे खाली
असाच माझा आवाज मी
गुणगुणत होतो ...

अंधाराची
भीती वाटते
घाबर गुंडी
किती दाटते
कुणास ठावुक मनात माझ्या
काय घोळत होतो ...

दूर देशी
कुणी राहते
माझ्या साठी
वाट पाहते
जाईन म्हणतो ,भेटेन म्हणतो
विचारात विरघळत होतो ..


सूर्य

Thursday, September 30, 2010

निरंकार (गझल)


दुःखाचा तुझा भार मला दे
मोत्यांचा तसा हार मला दे


प्रेमाला जसा मी उपरा हा
मायेचा तु आहार मला दे


वेडा वाकडा वाटत आहे
मूर्ति मंत आकार मला दे


कोमेजायला मी फुल झालो
पारावार श्रुंगार मला दे


भेटू पाहतो सतगुरु आता
अविनाशी निरंकार मला दे



सुर्य...

Sunday, September 26, 2010

मानव..(गझल )

मानवाची जात आहे
पाय ही पोटात आहे

कोण माझा मी कुणाचा
आज ते आज्ञात आहे

पेटतो हा कोण येथे ?
ही कुणाची वात आहे

देव माझा मी पणाचा
अंतरी हां गात आहे

एक धागा विस्तवाचा
साप नाही कात आहे

चावली जी जीभ कोणी ?
आत तोही दात आहे

ना कळे माझे मला मी
कोणत्या जीवात आहे


सूर्य

Friday, August 27, 2010

खेळ ..(गझल )

कायदा कोणता पाळु मी
का मनाला असे जाळु मी ..!

वेळ ही कोणती आखली
जन्म माझा कसा टाळु मी ..!

मोत्याचे हार ना वाजवी
पाषाना मौन का गाळु मी ..!

आजचा फायदा वेगळा
का हिशेबास हो चाळु मी ..!

जरी साधाच मी वागलो
कांकनांना कसे माळु मी ..!

माणसाची मती लोपण्या
कोणते खेळ हो खेळु मी ..!


सूर्य ....

Saturday, August 14, 2010

माझा मी पणा...

माझा मी पणा न आला माझ्या कामी
राहिलो न भरलेला सदा रीकामी

केले जरी काम मी कुणाच्या घरी
फुकट राहिलो तिथेच असा मी असामी

सारे वगळता न कोणते काम केले
न भरले पाणी कुणाचे अता मी

भरले पोट अगोदर राहिलो न उपाशी
कोणी न ओळखु शकले अखेर कसा मी

कधी न दिली कोणत्या हास्यात मी टाळी
फसलो जरी स्वताहा न फसवले कुणामी


सूर्य ...

Wednesday, August 11, 2010

जीवनात...(गझल )

कसा हार मानू असा जीवनात
मला भेटले आंधळे या जगात


तुला कार किर्दित बढ़ाई असेल
कसा उतरलो मी तुझ्यारे मनात


तुरुंगात होतो दहा चार वर्ष
तु गेलीस तेव्हा असे दडपणात


कधी भेट झाली कुणाची नसेल
तु भेटायला सांग एका वनात


मला वाटले संत होण्यात गोड
कसे ओठ आले तुझ्या रे मठात


सूर्य ..

सावल्यांना...(गझल )

भेट सावल्यांना
बोल सावल्यांना


खोट सावल्यांचे
खोल सावल्यांना


सार सावल्यांचे
मांड सावल्यांना


गोड सावल्यांचे
गीत सावल्यांना


कोण सावल्यांचे
सांग सावल्यांना



सूर्य ..

मनाला ..(गझल )

मी मनाला शोधतो रे
"मी" "पणाला" सोडतो रे

काय हा माझाच अश्रु
पाठ माझी मोडतो रे

कोणते मी गीत गातो
का सुराला गाळतो रे

लेख माझ्या कल्पनांचा
लेखने हा खोडतो रे

दोन रोटया आस माझी
चोरट्या का शेकतो रे

भूक नाही प्यास नाही
प्रेम थोड़े मागतो रे

सूर्य ....

तुझे एक स्वप्न....


दे तुझे एक स्वप्न मला

आयुष्य भर पुरेल असे

थकलो कधी या जगात जर

विसाव्याला उरेल असे



नको कामिनी नको दामिनी

देवुस असे घाव मला

स्वप्न तुझे ते साम्भालिन मी

कधी तरी तू पाव मला



जगाच्या या पाठीवर तू

सोडू नकोस मला कधी

तुझ्या वाचून नाही जगणार

तोडू नकोस मला कधी



पाहशील तू कालेल तुला

प्राण माझे खोल किती ते

येशील माझ्या मिठीत जेव्हा

गवसेल माझे मोल किती ते



तुझ्या रुपाची कमाल सारी

दर्पण ही लाजुन जाते

अंधारातही मशाल माझी

हृदयाला या भाजून जाते ..



सूर्य .....

Wednesday, July 14, 2010

जगने कठोर वाटे..


............................................
जगने कठोर वाटे ,मरण्यात आपलेसे
हसने कठोर वाटे ,रडण्यात आपलेसे


असली समोर माझ्या,मजला कधी न भावे
नसली कधी जराशी ,असण्यात आपलेसे


जग जिंकले असे ते,जगण्यात काय दोष
मरनात जागला तू , हरण्यात आपलेसे


तरने जलाशयाच्या ,नसती समोर पाणी
बगळेच म्हणती मग , बुडण्यात आपलेसे


रानावनात लागे ,वणवा ज़रा जरासा
मग झाडही उत्तरे ,जळण्यात आपलेसे


कवी: सूर्य

Sunday, June 13, 2010

.....उगाच वाटे कधी तरी.....


उगाच वाटे कधी तरी मी रडलो होतो
असाच रस्त्यात एकटा मी अडलो होतो

कुणास ठावुक किती उंच हा कडा असावा
कधी तरी मी इथून खाली पडलो होतो

विचार माझ्या शिक्षणाचा जर केला कोणी
कधी न वरचा मजला मी चढलो होतो

गुलाबास का काटे असतात ?वायफळ आहे
तोडतांना हृदयासकट मी अडकलो होतो

प्रेमात सारे आंधळे असतात असेच काहो
आवडत्या सखीस मी असाच नडलो होतो


..कवी ..सूर्य

Thursday, May 27, 2010

"..मी इथेच आहे.."



पाहतो अशी एक संध्या काळ मी
जिथे तुझा सुगंध तुझ्या सेवयेत आहे

झालोय गुलाम तुझा पांगळा मी
जिथे तुझी पावले मला नेत आहे

कुणी नाही येथे अजुन एकटा मी
पाहतो तुला ,तू माझ्या कवेत आहे

ना कोणती अशी सीमा जाणली मी
मी तुझ्या ,तू माझ्या सिमेत आहे

गेले सारे सोडून मजला ते पाहिले मी
गुंतलो असा तुझ्यात मी इथेच आहे

सूर्य..

Sunday, January 3, 2010

------------अवस्था-----------


आज तुझा आवाज ही
नाही येत
पण असेच भास् होतात

आता

गर्द काळ्या रंगांच्या छटा
डोळ्या समोरून जातात ...

आणि


मी हरवतो जागेपनिच्या
निजलेल्या अवस्थेत ......

सूर्य

चेह~या वरचा मोहरा...(अभंग)


नाही गायिले
कुणी काही अभंग
जे वाटले बेढंग
आपणाला ...!!

आपनाहुनी नाही
येथे कुणी थोर
चित्ती हे लान्डोर
खरोखर ...!!

आजवर माणूस
जानला का कुणी ?
मानला का कुणी ?
माणसाला ...!!

सांगायची वेळ
आली आता आहे
मानसा तू पाहे
स्वताहाला ...!!

कवी काही असा
नाही आहे सांगत
जावे तुम्ही रांगत
कुना पाशी ...!!

आरश्या वाचून तुम्ही
पाहिला कसा चेहरा ?
चेह~या वरचा मोहरा
लाजेसा ...!!

सूर्य

राम रूप देव (अभंग )..



वादळे अनेक
भेटतील आज
होवू नका नाराज
तुम्ही सुद्धा ....!!

मनात माझ्या
हाले निवडुंग
आजचा अभंग
जपुया ...!!

राम नाम तप
केले पहाटेला
आला तो हाकेला
राम रूपी ..!!

देवांचा तो देव
आज मज समोर
माझी भक्ति अघोर
वाटावीका ?..!!

वाटे जरी मला
असेकाही तरी
तुम्हासही परी
सांगेनही ...!!

देवाचा विशवास
सम्पादावा आधी
देवू नए उपाधी
आपन्हून ....!!

सूर्य ..

एकली नजर....


पाहती नजर
वाकती नजर
हां खेळ सारा खेळती
एकली नजर

वाहती नजर
शोधती नजर
स्वप्न मनात रंगते
एकली नजर

धाकटी नजर
शाहनी नजर
चोर- पावलांचे लक्ष्य वेधते
एकली नजर

हसते नजर
रुसते नजर
डोळ्यांतुन अश्रु गाळते
एकली नजर

एक खरी नजर
एक बुरी नजर
फरक शोधते ती
एकली नजर

सुंदर नजर
स्वीकारते नजर
व्यक्त भावना करते
एकली नजर

पास ती नजर
दुरावते नजर
फुल पान पाकळ्या दाविते
एकली नजर


सूर्य