Sunday, November 22, 2009

माफ़ कर ग सोना.....


आय्च्या गावात
नि बाराच्या भावात
खुप दिवसानंतर
मला माझी सोना दिसली
एक मूल खाली
हाथ धरून चालत होते
आणि एक कडेवर
असलेले ते मूल
खुप सुंदर आणि गोजिरे
पण बेवारशी ...कारण
कालच माहीत पडले
तिच्या नव~याने तिला सोडले
घटस्पोट झाला ......
आणि त्यात तिने love marriage केले होते
त्या बेवड्या सचिन शी
मी नाही म्हणालो नव्हतो पण
अजुन थोड़ा वेळ आहे
असे सांगुन तिला दोन वर्षे
थांबवले होते ...(लग्नासाठी )
पण नाईलाज .....

काल भेटली
सोना कैसी हो ?
मै ? मजामा
अ ग अजुन मी गुजराती शिकलो नाही ग
माझा प्रश्न ..मी विचारला
मग काय विचार केलायस आता ?
ती दबक्या आवाजात म्हणाली
"काय पण नथी "
का?

माझ्या वर विश्वास नव्हता का तेव्हा ?
आवु काय पण नथी संदीप ..
पण मारा पप्पा
अ ग मराठीत बोल ग ..!
नाही तर हिंदी ....!

तुम्हे पता नहीं ..
मेरे पप्पा ने शादी जब्बरदस्ती करवाई
मै ना केह रही थी ..
तुम्हे फोन भी किया था !
पर तुमने कहा छुट मत बोल.
पर मै सच केह रही थी ..

हां अच्छा ...तुझ्या लग्ना नंतर
मला माहीत पडले की तू
राज्श्थान मध्ये जावून लग्न केलेस ते
आणि तेहि love marriage .
मग ह्या पोरांना कुठे घेवुन चालालिस ?
मी म्हणालो "इयाच्च नाकि दोना"

ती ने रागाने माझ्या कड़े
पाहिले आणि रडत रडत निघून गेली
मला समजले नाही ती रडत का गेली ?

पण मग विमल भेटला
"विमल भाय इया आवतो "
मने एक बात बाताओ यार

बोलना ...
अ रे दोस्त मैंने एकजन को बोला
"इयाच्च नाकि दोना"
इसका मतलब क्या हूवा
"इथे ठेव ना" असाच ना
.
अबे बेवकूफ नाही
ऐसा नहीं बोलनेका ना... ऐसा बोलनेका इया मुकी दो
मग नाकि दो म्हणजे काय ?

फेक दे ..
मलाच माझ्या थोबाडीत
मारल्या सारखे झाले ...मला तिला म्हणायचे होते मुलांना
माझ्या घरी ठेव
पण मी म्हणालो
मुलांना फेकून दे ..

आणि माझे अश्रु मोकळे झाले
त्यांच्या वाटा
सरळ झाल्या आणि डोळ्यातून
खाली गालावर येवू लागले

माफ़ कर ग सोना ....माफ़ कर ग सोना
याचाच जप करत होतो मी ...रात्र भर

सूर्य

No comments:

Post a Comment