Wednesday, December 23, 2009

प्राण माझा घेतलास तू


प्राण माझा घेतलास तू ,का तुला आले रडे
पाहिले डोळे तुझे मी ,ते कोरडेच कोरडे

स्वप्न तुझी भंगलित
हास्य तुझे माळले
तुझ्यासाठी प्रिये मी
प्राण माझे गाळले
तुझ्यातला भाव मला शोधुनाही ना सापडे ...!!

आला कुठून तो असा
सुर तुझा भेटला
खंत मनात बाळलेला
तो जरासा वाटला
माझ्या साठी जिव तुझा ना कधी धड्पड़े...!!

रक्त माझे विचारेल
तुला तुझि कहानी
ख़ुशी ख़ुशी सांग हां
आठवेल माझी वाणी
खुशामती कर तू शब्दांतून तुझ्या गड़े ...!!

अनंतात जाईंन जेव्हा
याद तुझी येइल खुप
डोळे भरून पाहिन तुला
बोलेन काही राहीन चुप
ता~या सारखा अडकून इथेच मी आहे खड़े ...!!



सूर्य

नाम काका....

नाम काका....

नाम काका तुम्ही आज काल काव्यांजलि वर गुपचुप येता ...(किव्हा नाही )
माहीत नाही पण तुम्ही यावे आणि आमच्या कवितांना तुमचा मोलाचा अभिप्राय द्यावा
नाही तर आम्हाला(मला ) आमच्याच कविता कळत नाहित ...

एक विनंती....

आज काल आम्हा
नाम काका आमुचे
राजे काव्यान्जलिचे
दिसत नाही !!

कुठे गेलात असे
राहुनिया येथे
फिरले आमचे माथे
आता तरी !!

तुमची साठी माझा
प्रवास मी केला
प्रसाद तुम्ही दिला
अभिप्रायी !!

भेटण्याची इच्छा
होते माझ्या मना
तरीही सज्जन्ना
मी नाही !!

रवि माझा मित्र
गुप्तचर जणू
नव्या खबरा आनु
तोचि देई !!

आता हां पसरा
व्यर्थ कसा जाईल
तुम्हा साठी येइन
ठान्यालाही !!

माझ्या मणि चिंता
आता काही नाही
नाम काका तुम्ही
यावे परतुन !!

वाट मी पाहतो
आसुसल्या डोळ्यांनी
नाहीतर हाना जोड्यांनी
तुमच्याच !!

काही झाले तरी
काव्यान्जलिवर यावे
आम्हा भेट द्यावे
दररोज !!

अखेरचा आज
धाडिला निरोप
लावा नवे रोप
"सूर्य " नामा !!

सूर्य म्हणे तुम्हा
नाम काका यावे
पुन्हा एक वेळ व्हावे
दंग आमच्यात !!

सूर्य

वेळ २.१० रात्री २२/१२/२००९

तुम्ही नाही आलात
अश्रु माझे आले
भरले सारे नाले
तुडूंब ..!!

नाल्यान मागे सा~या
नदया ही येतील
भर भरून वाहतील
खरोखर ...!!

नाम काका तुम्ही
कवितांचा पाया
ऑनलाइन रचिला
आम्हा मध्ये ..!!

तुम्ही जर इथून
अदृश्य झालात
कोसळु चिखलात
आम्ही सारे ...!!

मंदिरी कळस
उभा राहिला आहे
पाया तुमच्या वाहे
आमचा अभिमान ..!!


सूर्य

मैत्री....



दगडाचा भाग, लागे कोना एक
कुठे तरी भेग, पडतसे !!

मैत्री तुझी माझी ,जिवापार जप
करू मग तप ,मैत्रीमध्ये !!

नको जावू दूर ,हाथी दे हाथ
निभावू आपण साथ ,अन्तापरी !!

भेंडीचा बाजार ,भरला लोकाचार
जमावाचा अचार ,दुतरफा !!

तुझी माझी दोस्ती ,निभावू चल
आता होवू अचल ,मैत्री मध्ये !!

सूर्य

सत्याचा संसार...

सत्याचा संसार
हाती घे अभंग
बोलू तेची दंग
करणारे !!

उघड हे पाप
करू आम्ही सारे
इशान्याचे वारे
आलेतरी !!

वेड्या मनापरी
काय आम्हा पाशी
कबिरांची काशी
मनातली !!

मनुष्याच्या देहि
घ्यावा जन्म ख़ास
देवांचा ही ध्यास
एकंदर !!

भेटे तोचि एक
सदगुरुच्या नावा
मोक्श्याच्या गावा
नेत असे !!

वाटे खोटा नाटा
तरी सत्य आहे
डोळ्यांनी जो पाहे
हरी दिसे !!


सूर्य

Sunday, December 20, 2009

तुझ्या विरहात मी....


तुझ्या विरहात मी
पान्यातली नाव झालो.


तुझ्या विरहात मी
दगडाचा देव झालो


तुझ्या विरहात मी
दूर दूर वर उडालो


तुझ्या विरहात मी
पाण्यात ही बुडालो


तुझ्या विरहात मी
सारे काही सोडून आलो


तुझ्या विरहात मी
आयुष्याला तोडून गेलो


तुझ्या विरहात मी
तुझ्या विरहात मी

सूर्य ....

तुझ्या साठी ....

ओल्या पानाच्या रेषेत
उभा आहे मी सरळ
मन माझं धुंद बेधुद
आहे ओलं चिंब तरळ

तुझ्या सुहासाचा मागोवा
आलो करत इथवर
तुझ्या मोग~याचा आठवा
मिळेल मी जाइन तिथवर

तुझ्या प्रेमात भेटले
मला अजरामर नाव
तुझ्या विरहात होइन
जणू दगडाचा देव

तू जावू नको दूर
रहा ज़रा आस पास
तुझ्या विना मी अधूरा
तुझ्या साठी करीन उपवास

सूर्य ....

असा मी सूर्य ...


नव्या जुन्या आठवणी माझ्या
तुझ्या शिवाय फिरवत आहे
विना कारण देह माझा मी
जागो जागी मिरवत आहे

कळेना कश्याला कालच्या रातीला
जागेने जागरण करीत होतो
कालचा उपाशी अजूनही तसाच
प्रेमाला म्हणे जिरवत आहे


डाव्या डोळ्याची मशाल घेवुन
चाललो सखिच्या भेटीला आहे
कठिन रस्ते तुझे अजुनही
झोप डोळ्यांत जागवत आहे

कालचा सूर्य मी अजूनही असाच
काळ्या रुपात पेटतो जरी
राख माझी सांडते वाटे भोवती
मखमली प्रेम तुझे वागवत आहे


असा मी सूर्य ...
सूर्य

Thursday, December 10, 2009

काही अर्धवट स्वप्न ....



माझ्या वेदनाना कोणी
कसे पाहिले नाही ...
ते येतील आणि घेवून जातील .
माझ्या कविता ,माझी स्वप्न
आणि काही अर्धवट राहिलेली पत्र

ज्यांना मी नेहमी माझ्या
जवळ बाळगत होतो
अशी ती त्यातलीच एक
माझी वही ..

ते कधी तरी येतील
दनदनत्या आवाजात
माझ्या सा~या कविता
फेकतील
दलदलीत आणि गहाळ करतील

मुसाफिरान्च्या येण्या जाण्याने
त्यांचे अवशेष ..
कदाचित राहतील ही ..काही मागे ..
पण त्या भग्न ..सामुग्रिला
मी अजुन ही तसेच लावीन माझ्या उराशी
आणि त्यांची ...मरे पर्यंत
काळजी करेन....

मग लोक पाहतील मला
आणि त्या माझ्या कविता हसतील
माझ्यावरच
माझी स्वप्ने ..माझ्या कडून पाठ
फिरवतील ..
उरली सुरली पत्रे ...ओक्ष्या बोक्षी रडवतिल
मला

पण तरीही मी
खंबीर ..राहीन आणि त्यांची माझीच राख
सर्व घरात
पसरविन ...एका टोका पर्यंत ..
जो पर्यन्त ...
माझी कविता मला शोधत नाही

..घरात व् घराच्या आस पास ....



सूर्य