Friday, August 27, 2010

खेळ ..(गझल )

कायदा कोणता पाळु मी
का मनाला असे जाळु मी ..!

वेळ ही कोणती आखली
जन्म माझा कसा टाळु मी ..!

मोत्याचे हार ना वाजवी
पाषाना मौन का गाळु मी ..!

आजचा फायदा वेगळा
का हिशेबास हो चाळु मी ..!

जरी साधाच मी वागलो
कांकनांना कसे माळु मी ..!

माणसाची मती लोपण्या
कोणते खेळ हो खेळु मी ..!


सूर्य ....

Saturday, August 14, 2010

माझा मी पणा...

माझा मी पणा न आला माझ्या कामी
राहिलो न भरलेला सदा रीकामी

केले जरी काम मी कुणाच्या घरी
फुकट राहिलो तिथेच असा मी असामी

सारे वगळता न कोणते काम केले
न भरले पाणी कुणाचे अता मी

भरले पोट अगोदर राहिलो न उपाशी
कोणी न ओळखु शकले अखेर कसा मी

कधी न दिली कोणत्या हास्यात मी टाळी
फसलो जरी स्वताहा न फसवले कुणामी


सूर्य ...

Wednesday, August 11, 2010

जीवनात...(गझल )

कसा हार मानू असा जीवनात
मला भेटले आंधळे या जगात


तुला कार किर्दित बढ़ाई असेल
कसा उतरलो मी तुझ्यारे मनात


तुरुंगात होतो दहा चार वर्ष
तु गेलीस तेव्हा असे दडपणात


कधी भेट झाली कुणाची नसेल
तु भेटायला सांग एका वनात


मला वाटले संत होण्यात गोड
कसे ओठ आले तुझ्या रे मठात


सूर्य ..

सावल्यांना...(गझल )

भेट सावल्यांना
बोल सावल्यांना


खोट सावल्यांचे
खोल सावल्यांना


सार सावल्यांचे
मांड सावल्यांना


गोड सावल्यांचे
गीत सावल्यांना


कोण सावल्यांचे
सांग सावल्यांना



सूर्य ..

मनाला ..(गझल )

मी मनाला शोधतो रे
"मी" "पणाला" सोडतो रे

काय हा माझाच अश्रु
पाठ माझी मोडतो रे

कोणते मी गीत गातो
का सुराला गाळतो रे

लेख माझ्या कल्पनांचा
लेखने हा खोडतो रे

दोन रोटया आस माझी
चोरट्या का शेकतो रे

भूक नाही प्यास नाही
प्रेम थोड़े मागतो रे

सूर्य ....

तुझे एक स्वप्न....


दे तुझे एक स्वप्न मला

आयुष्य भर पुरेल असे

थकलो कधी या जगात जर

विसाव्याला उरेल असे



नको कामिनी नको दामिनी

देवुस असे घाव मला

स्वप्न तुझे ते साम्भालिन मी

कधी तरी तू पाव मला



जगाच्या या पाठीवर तू

सोडू नकोस मला कधी

तुझ्या वाचून नाही जगणार

तोडू नकोस मला कधी



पाहशील तू कालेल तुला

प्राण माझे खोल किती ते

येशील माझ्या मिठीत जेव्हा

गवसेल माझे मोल किती ते



तुझ्या रुपाची कमाल सारी

दर्पण ही लाजुन जाते

अंधारातही मशाल माझी

हृदयाला या भाजून जाते ..



सूर्य .....