Friday, December 17, 2010

.... अश्या घडिची ....


अश्या घडिची साथ साजनी
भेट मला तू हीच मागणी ..

बागां मध्ये धूंडत होतो
फुलाफुलांत ही पाहत होतो
बागे मधली तू फुल राणी...

चिंतन करता मेघ गर्जना
वास्तवाशी भेट ह्या मना
बहरून जाईन ऐकून ही वाणी

शितल कोमल अंगावरुनी
पाहुन हसते रात चांदणी
न्याहाळ मजतु उघड पापणी


सूर्य ..

आजचे दिवस..

माझे राहत नाहित आजचे दिवस..!
येता जाता पुसतात आजचे दिवस...!!

कसा दुरावलो
तिच्या मनातून
का हरवलो ?
ह्या ह्रुदयातुन
पळताळत राहतो
मागचे दिवस ..!!

असा एकांती
पडून राहतो
थेंब डोळ्यातला
गळुन राहतो
आठवतात मग
सोन्याचे दिवस ..!!

(कधी अचानक )
उमटून जाते
नवे पावूल
हृदयाला होते
हृदयाची चाहुल
येणार असतात मग
पारावरचे दिवस..!!


सूर्य..

ओठ तरी (गझल )

ओठ तरी हलतातच माझे
सोन फुले फुलतातच माझे


साठवले गुलकंद मनाचे
स्वप्न असे पळतातच माझे


काय असा अवतार जहाला
ठार मला छळतातच माझे


आठवणी नुसत्या गुदमरल्या
अश्रु उगिच गळतातच माझे


मधुन असे वा~यावर कोणी
गीत मनी कळताताच माझे


रडत असा राहीन सुखाचा
भिजत नयन सुखतातच माझे



सूर्य ...