Sunday, May 6, 2012

---- कविता ----

माझाशी एकांतात
कुणी तरी बोलत ..
प्रेमावरच्या .आणि
विरहाच्या कविता
करून मागत ..

सार करून भागल कि हळूच म्हणत
तुझी कविता नाही समजत रे मला

मग मी सांगतो .
इतकं करण्या पेक्ष्या प्रेम केल असत
तुला पण माझ्या सारख काही सुचल असत

मग ती एका कोप~यात जावून बसते
माझ्या चेह~या वरच्या ता~याना एकट टिपत हसते

मी ही वेडा विचारतो तिला
का ग हसलीस ..

मग ती म्हणते  ..
विरह नको रे मला फ़क़्त प्रेम  हवय
विरहाची नाही रे अजून सवय ..

तुटलेल्या उल्का तारा होण्यासाठी तळमळतात
तश्याच माझ्या काही भावना एकांतात हळहळतात
प्रेमा साठी मी तुझ्या कविताच वाचते ..
अन विरहाचे शल्य कुठे तरी टोचते

म्हणून मला माझ्या कविता नकोयत

तुझ्याच कवितांवर प्रेम करायचं
एकट राहून सुद्धा तुझ्या साठी आयुष्यभर झुरायचं


ज्ञानदीप सागर

1 comment:

  1. छान लिहिताय. पण काही कल्पना मात्र खूप बोजड वाटतात. उदा. मायेचा आहार वगेरे. गझलेत अनेक शब्द मात्रा जुळवताना फार ओढून ताणून आणल्यासारखे वाटतात. माझे काही चुकत असेल तर माफ करा. आणि हो. ज्ञानदीप सागर , सूर्य हा काय प्रकार आहे.

    ReplyDelete