Sunday, January 3, 2010

------------अवस्था-----------


आज तुझा आवाज ही
नाही येत
पण असेच भास् होतात

आता

गर्द काळ्या रंगांच्या छटा
डोळ्या समोरून जातात ...

आणि


मी हरवतो जागेपनिच्या
निजलेल्या अवस्थेत ......

सूर्य

चेह~या वरचा मोहरा...(अभंग)


नाही गायिले
कुणी काही अभंग
जे वाटले बेढंग
आपणाला ...!!

आपनाहुनी नाही
येथे कुणी थोर
चित्ती हे लान्डोर
खरोखर ...!!

आजवर माणूस
जानला का कुणी ?
मानला का कुणी ?
माणसाला ...!!

सांगायची वेळ
आली आता आहे
मानसा तू पाहे
स्वताहाला ...!!

कवी काही असा
नाही आहे सांगत
जावे तुम्ही रांगत
कुना पाशी ...!!

आरश्या वाचून तुम्ही
पाहिला कसा चेहरा ?
चेह~या वरचा मोहरा
लाजेसा ...!!

सूर्य

राम रूप देव (अभंग )..



वादळे अनेक
भेटतील आज
होवू नका नाराज
तुम्ही सुद्धा ....!!

मनात माझ्या
हाले निवडुंग
आजचा अभंग
जपुया ...!!

राम नाम तप
केले पहाटेला
आला तो हाकेला
राम रूपी ..!!

देवांचा तो देव
आज मज समोर
माझी भक्ति अघोर
वाटावीका ?..!!

वाटे जरी मला
असेकाही तरी
तुम्हासही परी
सांगेनही ...!!

देवाचा विशवास
सम्पादावा आधी
देवू नए उपाधी
आपन्हून ....!!

सूर्य ..

एकली नजर....


पाहती नजर
वाकती नजर
हां खेळ सारा खेळती
एकली नजर

वाहती नजर
शोधती नजर
स्वप्न मनात रंगते
एकली नजर

धाकटी नजर
शाहनी नजर
चोर- पावलांचे लक्ष्य वेधते
एकली नजर

हसते नजर
रुसते नजर
डोळ्यांतुन अश्रु गाळते
एकली नजर

एक खरी नजर
एक बुरी नजर
फरक शोधते ती
एकली नजर

सुंदर नजर
स्वीकारते नजर
व्यक्त भावना करते
एकली नजर

पास ती नजर
दुरावते नजर
फुल पान पाकळ्या दाविते
एकली नजर


सूर्य