Sunday, November 22, 2009

वारा ....

वारा ....

कधी होतो शांत जरासा
कधी हळूच लचका देतो
येतो असाच एकांती
कधी लपून दचका देतो ...

कधी झुलुक होतो हलकीशी
कधी व्योमगंगे तुन वाहतो
अश्याच एका शांत तेत
कधी स्वताहाला हरवून देतो

कधी पवित्र स्नान गर्भाशी
असाच बिलगून वाहून जातो
भासे आसपास ,पण नसे कवेत
कधी ॠतुंची मैत्री देतो ..


सूर्य

वारा ....

पाहण्यास मी आतुर आहे
अवती भवति असला जरी
स्पर्श त्याचा मोहनी जातो
भासे मज परिस परी..

निराशा असल्यास डोळा
घुमतो असाच चहु कड़े
वाहून नेतो चिंतान्ना अन
आनंद फुलावी इकडे तिकडे


सूर्य

वारा....

आताच होता गेला असेल
सा~यांनी त्याला घेरले असेल
सापडेल का कुणाला तो
हाता त्यांच्या काही नसेल

भलते सलते प्रश्न माझे
मनाच्या माझ्या कोडे पड़े
कसा असेल वारा हा ?
कोनाच त्याला पकडत नसेल

सांगिल का कोणी मला
चोही कड़े आहे जसा
वारा त्याला म्हणतात सारे
खरा असेल का तो नसेल


सूर्य

वारा ....

अजुन ही असतील कोडी
येता आहेत माझ्या मनात
जेव्हा तू
असतोस
मी असतो
आव्ळ्तोस
घट्ट करतोस
माझी पकड़
सैल होताच
फिरतोस
आजुला
बाजुला
मी तुझ्यात
दंग
भंग
संग
नाचतो
खेळतो
हसतो
फसतो
आनद साजरा करतो
तेव्हा तू असतोस माझ्या सोबत


सूर्य

पसरल्यावर शांतता
होतो असाच गुडुप
कधी एने नाही
कधी जाने नाही
तरीही भास् होतो तुझा
तसाच मी ही येतो
तुझ्या कड़े आता
आणि तू मला समज
की मी तुझ्यातलाच आहे
माझ्या अवती भवति
तुझे वेटोळे कर
माझ्या मुखातून
तुझा प्राण आणि तुझ्या
मुखातून मी
असाच येत राहो
ह्या साठी ..
माझ्या अंतर बाह्य
तुझ्या सागरातुन तू
दरवळत रहा ..

असाच .
स्वछंदी
एकांती
भरकटत
धुवांवर
माझ्या
आसपास ..


सूर्य

आला आणि गेला
तो तूच होता
मला समजुन झाले
हां ही तूच होता
तुझ्या वाचून मी आणि
माझ्या वाचून तू
नाही राहू शकत
म्हणुन गुपचुप
झोपेत असताना
येतोस आणि पटकन
पळुन जातोस ..

हे तुझे वागने
बरे नाही
...माझ्या पासून
लपशील तर मी
तुझ्यात कसा हरवीन

तुझे कोडं
तू कसा सोडवशील
माझ्या वाचून
तू आणि तुझ्या
वाचून मी असे
नाही होवू शकत
तू असाच ये
आत जा
माझे खंगाळलेले
शरीर..
निर्बंध असतांना
तू एक वारा बनून ये आणि
समेतून जा
आपल्यातच

सूर्य

घोर निराशेचा
केंद्र बिंदु असलेलो मी
तुझ्या प्रेमात
पडलो तरी कसा
...
..
..तू ला माहीत असेल ही
कारण मी
तुझ्यातच आपले अस्तित्व पाहतो
जगतो ..तुजवाचुन नाही


सूर्य

तू असा राहशील
का ?
जसा
आता आहेस
कोण जाने तुझ्यातच
किती तरी दुर्गंधी
असेल ..
आणि आता ती शुद्धी करना साठी
तू
माझ्या कड़े
आपोआप
खेचला जात आहेस
मी तुझी वाट
पाहत नाही
पण तूच असा
खेचला जातोस की
मला बैचेन
व्हावे लागते
आणि तुला नविन रुपात
मी आभासतो

असाच



सूर्य

आज तू हल्कल्लोळ
घातलास
आणि दाखावलिस
तुझी दहषद
किती ते
पण मी
असा नाही
मला कमजोर
समजू नकोस
तुझ्या हुन मी
जास्त घातक आहे
तुझा देखिल
प्राण घ्यायला
मागे पुढे
पाहणार नाही
तुझ्या रक्ताच्या
चिरक्या उडविन
म्हणुन माझ्याशी
सांभाळुन रहा


एक चेतावनी ...वा~याला



सूर्य

आज तू माझ्या सोबतीला
का आहेस ?
सोड ना मला
जावू दे कुठे तरी लांब
तुझ्या पासून .....

असा ही दिवस
येइल की तूच मला
सोडून जाशील आणि मी
काहीही करू शकणार नाही
तेव्हा मला तुझी याद येइल
जरी आली
तरी तुला बोलावनार नाही रे

सूर्य

तुझी दुनियाच अजब गजब
तू ला माहीत
नसेल कदाचित
पण मी ती
अनुभवली आहे
आज .....आणि तुला सांगतो
तू सावध रहा
आता पासूनच
नाही तरी तुझ्या शिरांत
वाहणारा प्राणवायु
संपेल .आणि तू काळवंढशील रे


सूर्य

फिकिर

माझ्या शी शरियत
करतो काय ?
तू नाही जिंकू
शकत रे
नको तिथे तू
ओला पडलेला असतोस
आणि हवा तिथे सुका
मी खाली राहतो
जमिनीवर आणि तू
वर जास्त प्रमाणात
आपने मिलन होते पण
कसे
सुके सुके
तू मला सोडशील
एकदा पडेन पड़ें
पण तू मायेची ओन्झळ
करुण मला सावरशील
म्हणुन मला फिकिर नाही कसली



सूर्य

तुझी निर्मिती कशी झाली ?
हे जरी एक गुपित
असले तरी तुझा
ह्रास कसा होइल
हे उघड आहे
मी तुला मारणार नाही
पण तुझ्या चिंधडया चिंधडया
उडविन ...हेच खरे


सूर्य

आपटलोच तुला
सरळ कापत सुटलो
आडकलो
फिरलो
गुंडाळलो

आणि
चवटाळलो
एकच आरोली मारली
आणि तुला ती
कापत गेली
अगदी माधो मध्
तू छाटला गेलास
तेव्हाच
आता तरी
मान्य कर


सूर्य

रुतलो खोल वर
आणि तुला
दिला शत्रु पक्ष्याचा
वीडा उचलायला
तू येशील आणि उच्लशील
हे भाकित सत्य आहे

पण ते नगण्य
शोध घेन्या परी काहीच नाही
तू असाच येशील
एखाद्याच्या
खांद्यावर
ओझं
देवून
त्याच्या डोक्यावर

कावळ्याने चोच मारावी
तसा



सूर्य

रडलो कधी
जर
आयुष्यात आता परत
तू ये ,
तू ये ,
तू ये माझे
डोळे पुसायला
तुला नाही
म्हननार नाही
पण स्वताचा
विचार कर
माझ्या रडन्याने
तुला काही
त्रास नाही
होणार ना

तुझी काळजी वाटते



सूर्य

आज आला
वा~याचा आवाज

एइकुन फिरलो
उलटा मी आज

काहीतरी सांगणे
होते त्याला मला

सांगनेच विसरला
का रे तू रे मला

म्हणाला तो मला
गरम होते ज़रा

पंखा तुझा फिरव
माझ्या कड़े खरा

मी म्हणालो
जाशील उडून
हाथ पाय तुडवून
जावू नको उखडून
ठेव मला पकडून
पंखा देतो झाडून

तुला होइल गारवा
तू गाशील मारवा
उदय येशील का परवा


सांगेन केले मी माझे
आनंदी झाला तो ही आज
अडला तो मला
म्हणे करू नको माज

मित्र म्हणुन मला
खुप सतावले
नाही आज मी तुला हवाही देत
निघून जातांना हेच बतावले


सूर्य

तू आज येणार होतास ना
उसळ्त्या ,उफ़ाळत्या
लाटां सोबत

मग काय झाले त्याचे ?
का असा परत फिरलास?

मी तुला भेटण्या साठी
आतुर झालो होतो
आणि
तू तुझा मार्ग
बदललास
पुन्हा कधी तरी ये असाच
मग भेटुया

.

निवांत


सूर्य

तुला माझेच घर
भेटलं होतं
उध्वस्त कारायाला
भेटायला आलास खरा
पण चुकीच्या वेळी
चुकीच्या ठिकाणी
मी होतो रे तुझा मित्र
म्हनू तुला सावरून घेतले
नाहीतर
लाथ मारून
बाहर काढले असते
तूझ्या सकत लाटेला ही
त्या सागर किना~या पर्यन्त
..
मग बसलो असतो
शांत निवांत

एका कोप~यात


सूर्य

आलास ...
आहा आलास का विचारले..?
नाही म्हणून माझी
फजीती करू नको
म्हणजे झाले ..
बरं झाले तू आलास
नाहीतर मी एकटा होतो
रे इथे
खुपदा मी असाच विचार करत होतो
तू कुठे राहतोस
कधी येतोस ..कधी नाही
नक्की तुझे काम कुठे चालते ?
तू मला तुझ्या
बद्दल काहीच सांगत नाहीस
तरीही मी तुझा पत्ता लावतो ..
आता मी लावतो का ?
तू माझा पत्ता लावतो .
हे देवच जाने ..
देव कसा जाने रे
ही गोष्ट तर आप्ल्यात्लीच आहे ..
मग तूच लावतो..


सूर्य






No comments:

Post a Comment